शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोरोनाचा परिणाम : टाळेबंदीपूर्वी प्रदूषण जास्त, महापालिकेचा पर्यावरणविषयक अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 00:32 IST

Thane : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नुकताच पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल २०१९-२० सादर केला आहे. यामध्ये काही ठळक बाबी नमूद आहेत.

ठाणे : लॉकडाऊनमुळे या वर्षी शहरातील हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषणात कमालीची घट झाली. या तीनही घटकांतील प्रदूषण यंदा मध्यम स्वरूपात गणले गेले आहे. मार्च ते सप्टेंबर या कालावधीत शहरात अनेक कामे ठप्प होती. मेट्रोचे कामही थांबले होते. वाहनांचा वेगही जवळजवळ मंदावला होता. त्यामुळे शहराच्या हवामानावर त्याचा चांगला परिणाम झाल्याचे महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून स्पष्ट झाले आहे. तीनहात नाक्यावरील अतिप्रदूषित क्षेत्रातही यंदा मध्यम प्रदूषित आढळले आहे.ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नुकताच पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल २०१९-२० सादर केला आहे. यामध्ये काही ठळक बाबी नमूद आहेत. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने हवा गुणवत्ता मापनासाठी निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा तीन क्षेत्रांची विभागणी केली होती. तेथील हवेतील प्रदूषकांचे मापन करण्यात आले. त्यानुसार, निवासी क्षेत्र अर्थात कोपरी प्रभाग कार्यालय, व्यावसायिक क्षेत्रात शाहू मार्केट, नौपाडा आणि औद्योगिक क्षेत्रातील रेप्टाकोस, ब्रेट ॲण्ड कंपनी येथील हवा मध्यम स्वरूपाची आढळली आहे. विशेष म्हणजे, तीन हात नाका हा परिसर दरवर्षी अतिप्रदूषित क्षेत्रात गणला जातो. यंदा मात्र, येथील हवाही प्रदूषित, मध्यम आणि समाधानकारक गटात मोडली आहे. शहरातील विविध चौकांमध्ये टाळेबंदीपूर्वी, म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात आणि टाळेबंदीनंतर म्हणजेच एप्रिल महिन्यात हवा प्रदूषकांचे मापन केले. शहरातील जीवनमान फेब्रुवारीपर्यंत सुरळीत होते. वाहतूक आणि बांधकाम व्यवसाय जोरात सुरू होते. त्यामुळे या काळात शहराची हवा प्रदूषणाची पातळी मध्यम श्रेणीत होती. सर्वच चौकातील सूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण दिलेल्या मानकांपेक्षा म्हणजेच १०० पेक्षा जास्त होते. टाळेबंदीनंतर शहराचे जीवनमान ठप्प झाले. परिणामी, शहराची हवा प्रदूषण पातळी समाधानकारक श्रेणीत आली.

वाहनांवर हवे नियंत्रणअनलाॅकमध्ये रस्त्यांवर वाहनांची वर्दळ हळुहळु वाढत आहे. वायू प्रदुषणात भर टाकणाऱ्या महत्त्वाच्या घटकांमध्ये वाहनांमधून होणाऱ्या उर्त्सजनाचा समावेश असतो. चांगल्या आरोग्यासाठी वायू प्रदुषण नियंत्रणात हवे असे ठाणेकरांना वाटत असेल तर वाहनांचे प्रमाणही नियंत्रणात हवे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस