शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

कोरोनामुळे व्हॅलेंटाइन डे व्हर्च्युअल करू साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:42 IST

ठाणे : येत्या रविवारी व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस आहे. दरवर्षी वाट पाहत असलेल्या या दिवसावर यंदा मात्र कोरोनाचे ...

ठाणे : येत्या रविवारी व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस आहे. दरवर्षी वाट पाहत असलेल्या या दिवसावर यंदा मात्र कोरोनाचे संकट आहे. पुढचे अनेक व्हॅलेंटाइन डे साजरे करायचे असतील तर यंदा घरीच, सुरक्षित राहा. प्रत्यक्ष भेटण्याचा अट्टहास न करता ऑनलाइनदेखील हा दिवस साजरा करता येऊ शकतो, अशी मते तरुणाईमधून व्यक्त होत आहेत.

फेब्रुवारीचा दुसरा आठवडा हा व्हॅलेंटाइन वीक म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा आठवडा ''रोज डे''ला सुरू होऊन ''व्हॅलेंटाइन डे''ला संपतो. सात दिवसांत येणारे विविध डेज ही तरुणाई मोठ्या उत्साहाने साजरे करताना दिसत असते. महाविद्यालयात वेगळाच उत्साह या आठवड्यात तरुणाईमध्ये पाहायला मिळत असतो. तसेच प्रेमी आणि प्रेमिका एकमेकांसाठी वेगवेगळ्या भेटवस्तू देत असतात. या आठवड्यात आपल्या जवळच्या आणि आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत मॉल्स, हॉटेलमध्ये हा दिवस साजरा करायला तरुण मंडळींची गर्दी असते. दुकाने, मॉल, रेस्टॉरंट या दिवशी हार्ट शेपने सजवलेली पाहायला मिळतात. अनेक ऑफर्सही यावेळी असतात. कोरोनामुळे यंदा मात्र तरुणाईच्या उत्साहावर विरजण पडणार आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाता कुटुंबासोबत एक वर्ष हा दिवस साजरा करायला हरकत नाही, तर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून हा दिवस साजरा करावा, अशी मते तरुण मंडळी व्यक्त करीत आहे.

---–------------------

व्हॅलेंटाइन डे’ सार्वजनिक ठिकाणी भेटूनच साजरा केला पाहिजे, हा अट्टहास करणं, मुख्यत्वे कोरोनाकाळात योग्य नाही. आपल्या आयुष्यातल्या खास व्यक्तीला एखादी भेटवस्तू ऑनलाइन पाठवणं, व्हिडीओ कॉलवरून संवाद साधणं आणि आपल्या भावना व्यक्त करणं, अशा नव्या पद्धतीने आपण व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकतो. या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या कुटुंबीयांसोबत हा दिवस साजरा करणे, हे आपल्या कुटुंबीयांना, या दिवशी, एक वेगळंच सरप्राइझ असेल !

- कौस्तुभ बांबरकर

........

निश्चितच करू शकतो. शासनाने आखलेल्या नियमांचं पालन करून जर प्रत्यक्षात भेटणं आणि एन्जॉय करणं शक्य असेल तर का करू नये. तसंही आपण आपले इतर सण पण साजरे केलेच आणि जर भेटणं शक्य नसेल तर या लॉकडाऊनमध्ये आपण इतर ऑनलाइन पर्याय पण शिकलोच आहोत. ऑनलाइन मीटिंगसारखं ऑनलाइन डेटसुद्धा होऊच शकते. तसं तर प्रेम व्यक्त करायला एका विशिष्ट दिवसाची गरज नसते.

- प्रणीत गिरकर

.........

कोरोनाचे सावट अजून गेले नसताना व्हॅलेंटाइन डे साजरा करावा की नाही? प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. सकारात्मक आणि नकारात्मक. प्रेम हे एकाच दिवशी साजरेेे का करायचे? माझ्या मतानुसार, हा एकच नाही? तर असे अनेक व्हॅलेंटाइन डे जर आपल्या पार्टनरसोबत साजरे करायचे? असतील तर... घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आनंद पसरवा.

- प्राजक्ता सावंत

........

सध्याची परिस्थिती बघता कुठलाही सण, इव्हेंट साजरे करण्याची आवश्यकता नाही आणि त्यातल्या त्यात व्हॅलेंटाइन डे अजिबातच नाही. हा सण आपल्या जीवापेक्षा किंवा इतरांना असुरक्षित ठेवून साजरा करणे इतका महत्त्वाचा आहे का? यावर्षी कुठेही गर्दी करून सण साजरे करू नये, हीच इच्छा.

- दीपक तपासे

........

सध्याची स्थिती पाहता व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात येऊ नये. कोरोनाचा पूर्ण अंत होत नाही, तोपर्यंत आपण विनाकारण गर्दी टाळली पाहिजे... नाहीतर २०२१ मध्ये ही २०२० सारखी लॉकडाऊनची परिस्थिती येऊ शकते.

- नितीन यादव

...........