कोरोना : २२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST2021-05-31T04:28:57+5:302021-05-31T04:28:57+5:30
------------------------------------------------ ज्येष्ठांसाठी लसीकरणाची विशेष व्यवस्था कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात उद्या हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील ...

कोरोना : २२ जणांचा मृत्यू
------------------------------------------------
ज्येष्ठांसाठी लसीकरणाची विशेष व्यवस्था
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात उद्या हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील नागरिकांच्या कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण केले जाणार आहे. कल्याण पूर्वेकडील नेतिवली येथील प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र आणि डोंबिवली पूर्वेतील सावळाराम क्रीडासंकुल लसीकरण केंद्र या दोन केंद्रांवर सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली. तर, कल्याण पूर्वेतील जरीमरी विद्यामंदिर, मांडा टिटवाळा येथील विद्यामंदिर शाळा, कल्याण पश्चिमेकडील वाणी विद्यालय आणि डोंबिवली पश्चिमेतील डॉन बॉस्को विद्यालय या चार लसीकरण केंद्रांवर केवळ ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑफलाइन टोकन पद्धतीने लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, उर्वरित १९ लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुस-या डोसची व्यवस्था लस संपेपर्यंत करण्यात आली आहे.
----------------------------------------------------