वरिष्ठ निरीक्षकांसह १८ पोलिसांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:45 IST2020-07-25T00:45:05+5:302020-07-25T00:45:16+5:30

मीरा रोड : मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह १८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पोलीस ...

Corona to 18 policemen including senior inspectors | वरिष्ठ निरीक्षकांसह १८ पोलिसांना कोरोना

वरिष्ठ निरीक्षकांसह १८ पोलिसांना कोरोना

मीरा रोड : मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह १८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पोलीस ठाण्यातील आतापर्यंत एकूण ३१ जणांना कोरोना झाला आहे.

शहरात कोरोनाची लागण मार्चअखेरीस नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली होती. या भागातील नागरिक लॉकडाऊनचे पालन करत नाहीत म्हणून तक्रारी आल्या होत्या. परंतु, नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे व कर्मचाऱ्यांनी विविध उपाययोजना केल्या, जेणेकरून नयानगर भागात रुग्ण सापडण्याचे प्रमाण नगण्य झाले होते.

या आठवडाभरात एकापाठोपाठ एक अशा तब्बल १८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. स्वत: बर्वे यांच्यासह अन्य तीन पोलीस उपनिरीक्षक आणि १४ पोलीस कर्मचारी यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आधीच पोलीस ठाण्यातील बळ ८० इतके कमी असताना त्यात १८ जण कर्तव्यावर हजर राहू शकणार नाहीत. या आधीही १३ पोलीस कोरोनाग्रस्त होते.

Web Title: Corona to 18 policemen including senior inspectors