पल्स पोलिओ लसीकरणाला सहकार्य करावे - आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:43 IST2021-09-18T04:43:47+5:302021-09-18T04:43:47+5:30
भिवंडी : शहर महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुक्रवारी आढावा घेऊन प्लस पोलिओ लसीकरण ...

पल्स पोलिओ लसीकरणाला सहकार्य करावे - आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख
भिवंडी : शहर महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुक्रवारी आढावा घेऊन प्लस पोलिओ लसीकरण सुरळीत पार पाडावी, असे निर्देश पालिकेच्या आरोग्य विभागास दिले आहेत. शहरात ० ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुलांकरिता पल्स पोलिओ मोहीम २६ सप्टेंबरला राबवण्यात येणार आहे.
सर्व नागरिकांनी आपल्या घरातील व आपल्या परिवारातील सर्व शून्य ते पाच वयोगटातील सर्व लहान मुलांना पल्स पोलिओचा डोस द्यावा, लसीकरण कार्यक्रमात नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना केले आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्य वैद्यकीय अधिकारी कारभारी खरात, डॉ. वर्षा बारोड चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉ. किशोर चव्हाण, भिवंडी आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर व सर्व १५ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते.