डोंबिवली : केडीएमसीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप सुरू केला आहे. आयुक्तांनी आश्वासन देऊनसुद्धा पगार झाला नाही म्हणून कंत्राटी कामगारांनी सोमवारी (29 ऑक्टोबर) सकाळपासून संप सुरू आहे. कंत्राटी कामगारांमध्ये सफाई कामगार आणि घंटा गडीवरील वाहन चालकांचा समावेश आहे. यामुळे कचरा प्रश्न गंभीर बनणार आहे. डोंबिवलीच्या खंबालपाडा डेपो मधून एकही कचऱ्याची गाडी बाहेर पडलेली नाही. येथे कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.
कंत्राटी सफाई कामगारांचा पुन्हा संप सुरू, आयुक्तांचे आश्वासन फोल ठरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 08:38 IST