शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

पहिल्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीने ठाण्याला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2021 4:05 AM

ठाणे : ऑक्सिजनच्या मर्यादित पुरवठ्यामुळे कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिका आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने, ...

ठाणे : ऑक्सिजनच्या मर्यादित पुरवठ्यामुळे कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिका आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने, ठाणे पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे उभारण्यात आलेल्या एफडीए प्रमाणित पहिल्या ऑक्सिजन प्रकल्पाचा प्रारंभ नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. २० टन ऑक्सिजन क्षमतेच्या या दोन प्रकल्पांमुळे ठाणे कोविड रुग्णालय आणि पार्किंग प्लाझा रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सुरुवातील ३.२ टन इतका ऑक्सिजन मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात दोन प्लान्ट सुरू झालेले असून, आणखी एक प्लान्ट कळवा रुग्णालयात सुरू करण्यात येणार असून, त्या ठिकाणी ६५० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन रोज निर्माण होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली, तसेच आणखी एक २२५ ऑक्सिजन सिलिंडर प्लान्ट येत्या काही दिवसांत कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एमएमआर क्षेत्रात अशाच प्रकारे ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास खा.राजन विचारे, आ.रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृहनेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर, सांस्कृतिक कार्यक्रम समिती अध्यक्षा प्रियांका, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, संजय हेरवाडे, उपायुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.चारुदत्त शिंदे आदी उपस्थित होते.

अवघ्या १५ दिवसांत युद्धपातळीवर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. महापालिकेने स्वत:चा ऑक्सिजन प्रकल्प पीएसए तंत्रज्ञानावर उभा केला आहे. एफडीए प्रमाणित या पहिल्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून, हवेतील ऑक्सिजन टाकीमध्ये साठवून त्यामधील अशुद्ध घटक वेगळे करण्यात येतात. या ऑक्सिजनची शुद्धता ९३ टक्के आहे.

या दोन्ही प्रकल्पांतून प्रती दिवस ३५० सिलिंडर इतका ऑक्सिजन निर्माण होणार आहे. साधारणत १५० रुग्णांना १० लीटर प्रती मिनीट ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाद्वारे निर्माण केलेला ऑक्सिजन पाइपलाइनद्वारे रुग्णालयास पुरविण्यात येणार आहे. या प्लान्टमध्ये वापरण्यात आलेले कॉम्प्रेसर हे जर्मन बनावटीचे आहेत, तर ऑक्सिजन जनरेटर अमेरिकन बनावटीचे आहेत.

.........

राज्यातील हा पहिला ऑक्सिजन प्रकल्प असून, येथून रोज ३५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर निर्माण करणार आहे. ३०० बेड ऑक्सिजन पेशन्टसाठी हा पुरवठा करणार आहे. २२५ जम्बो सिलिंडरचा प्लान्ट लवकरच सुरू होणार आहे, तसेच कळवा रुग्णालयातही ६५० जम्बो सिलिंडरचा प्रकल्प रुग्णालयात सुरू होणार आहे. एकूण चार प्लान्ट महापालिका हद्दीत सुरू होणार असून, त्याचा फायदा रुग्णांसाठी होणार आहे. राज्याच्या इतर ठिकाणी अशाच पद्धतीने ऑक्सिजनचे प्लान्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. ज्यांनी यासाठी मेहनत घेतली, त्या सर्वांचे मी अभिनंदन करीत आहे.

- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा

...............

वाचली