केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी ठाण्यात कोरोना रुग्णालयाची उभारणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 05:32 PM2020-12-27T17:32:47+5:302020-12-27T17:35:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात ठेकेदाराच्या फायद्यासाठी कोरोना रुग्णालयाची उभारणी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार ...

Construction of Corona Hospital in Thane started only for the benefit of the contractor | केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी ठाण्यात कोरोना रुग्णालयाची उभारणी सुरू

कोरोना आपत्तीमध्ये महाराष्ट्रात पाच हजार कोटींचा घोटाळा?

googlenewsNext
ठळक मुद्दे भाजपचा आरोप कोरोना आपत्तीमध्ये महाराष्ट्रात पाच हजार कोटींचा घोटाळा?

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात ठेकेदाराच्या फायद्यासाठी कोरोना रुग्णालयाची उभारणी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. सध्या ठाण्यात एक हजार ६२० बेड रिकामे आहेत. तरीही आणखी तीन हजार १४४ बेडचे रुग्णालयाच्या उभारणीबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कोरोना आपत्तीच्या काळात उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रात पाच हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला आहे.
ठाणे शहरातील कोरोना रु ग्णांसाठी उभारण्यात येत असलेल्या व्होल्टास, बोरिवडे आणि बाळकूम येथील रु ग्णालयाला सोमय्या यांनी आमदार निरंजन डावखरे आणि महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्यासह भेट दिली. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. ठाणे महापालिकेच्या बाळकूम, कळवा आणि मुंब्रा येथील रुग्णालयाच्या बेडची क्षमता एक हजार ८७५ असून तिथे अवघे २५२ रु ग्ण आहेत. सध्या एक हजार ६२० जागा रिक्त आहेत. बुश कंपनीतील ४४० आणि बोरिवडे येथील ३०४ रु ग्णक्षमतेचे केंद्र उद्घाटनानंतर रु ग्ण नसल्याने सुरू झालेच नाही. तर ज्युपीटर हॉस्पिटलनजीकच्या पार्र्किं ग प्लाझामधील एक हजार ३०० बेडचे रुग्णालय तयार झाले आहे. मात्र, व्होल्टासच्या जागेवरील आणखी एक हजार बेडच्या रु ग्णालयाचे काम सुरू केले आहे. महापालिकेच्या रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही बेड रिकामे आहेत. सध्याच्याच रुग्णालयात क्षमतेएवढे रु ग्ण नसताना नव्या रुग्णालयाचा घाट केवळ ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी केला जात आहे, असा आरोपही भाजपने केला. या माध्यमातून राज्य सरकार आणि महापालिकेकडील कोट्यवधी रुपयांची लूट केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ठाण्यात उभारलेले रुग्णालय आणि सेंटरच्या व्यवस्थापनाची कंत्राटे चेंबूर येथील एकाच कंपनीला मिळाली. या कंपनीबरोबर केलेल्या करारात रु ग्ण नसतानाही २५ टक्के रक्कम देण्याची हमी दिली. त्यामुळे कंत्राटदाराच्या तिजोरीत काम न करताच आयता पैसा जमा होणार आहे. हा चमत्कार केवळ ठाणे महापालिका व महाविकास आघाडी सरकारच करू शकते, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.
* कोरोना आपत्तीच्या काळात ठाकरे सरकारने महाराष्ट्रात सुमारे पाच हजार कोटींचा घोटाळा केला. या विषयावर भाजपातर्फे लवकरच काळी पत्रिका काढली जाईल, असेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Construction of Corona Hospital in Thane started only for the benefit of the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.