शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

शहरी पक्ष्यांचे संवर्धन करा, पक्षी निरीक्षणाची संधी, डोंबिवली बर्ड रेसवर सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:35 AM

ठाण्यात रंगणा-या ३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर झाली असून या संमेलनात होणा-या चर्चासत्राला सादरीकरणाचीही जोड असेल.

ठाणे : ठाण्यात रंगणा-या ३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर झाली असून या संमेलनात होणा-या चर्चासत्राला सादरीकरणाचीही जोड असेल. यात शहरी भागांतील पक्षी, त्यांचे संवर्धन आणि त्यात स्थानिकांचा सहभाग या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या चर्चासत्रात शास्त्रज्ञ, संशोधकआणि हौशी पक्षिमित्रांचा सहभाग असेल.होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्यातर्फे हे संमेलन शनिवार, २५ आणि रविवार, २६ नोव्हेंबरला गडकरी रंगायतनमध्ये पार पडेल. या संमेलनात ठाणे महापालिका आणि मुंबईच्या मन्ग्रोव्ह सेलचा महत्त्वाचा सहभाग आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ पक्षिमित्र आणि निसर्ग अभ्यासक दत्ताजी उगावकर भूषविणार आहेत. या वर्षीच्या संमेलनाचे सूत्र ‘नागरी परिसरातील पक्षी आणि त्यांचा जीवनक्रम’ हे आहे. २५ नोव्हेंबरला सकाळी ९.३० वा. महापौर मीनाक्षी शिंदे, संमेलनाचे अध्यक्ष दत्ताजी उगावकर, विशेष अतिथी उल्हास राणे, आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद््घाटन होणार आहे. सकाळी १०.३० वा. संमेलनाचे अध्यक्ष दत्ताजी उगावकर यांचे भाषण होईल. सकाळी ११ वा. संमेलनाचे विशेष अतिथी निसर्गतज्ज्ञ उल्हास राणे हे शहरी भागांतील पक्ष्यांच्या संवर्धनातील समस्यांवर मनोगत व्यक्त करीत सादरीकरण करतील. सकाळी ११.४० वा. बीएनएचएसचे डॉ. दीपक आपटे हे भारतातील गिधाडांच्या संवर्धनाविषयी माहिती देतील. दुपारी १२.३० वाजल्यापासून टेक्निकल सत्रांना सुरूवात होईल. त्याची सुरूवात पक्ष्यांच्या स्थलांतरावर असेल. त्यात दुपारी १२.३५ वा. बीएनएचएसचे शास्त्रज्ञ डॉ. साथीयासेल्वम हे भारतातून उडत दुसºया देशात जाणाºया पक्ष्यांची इत्यंभूत माहिती देतील.ठाणे खाडीकिनारी आढळणाºया पक्ष्यांच्या अधिवासाच्या सत्रात दुपारी २. ३५ वा. खारफुटी विभागाचे मुख्य वनसंरक्षक वासुदेवन एन. हे मन्ग्रोव्ह सेलद्वारे ठाणे खाडीकिनाºयात संवर्धनाचे काम कसे सुरू आहे, याची माहिती देतील. दुपारी ३.३० वा. बीएनएचएसच्या शास्त्रज्ञ तुहीना कट्टी या पक्षी स्थलांतराच्या अभ्यासासाठी बर्ड रिंगिंगचा उपयोग कसा होतो, याची निरीक्षणे मांडतील.दुपारी ४.२० वा. ज्येष्ठ निसर्गतज्ज्ञ डॉ. किरण पुरंदरे छोट्या तलावांच्या मदतीने पक्षीसंवर्धन कसे करता येईल, ते सांगतील. सायंकाळी ५.३० वा. ते पक्षी आणि मानव सहवास यांच्याबद्दलची आपली निरीक्षणे आणि अनुभव यावर बोलतील. रविवारी सकाळी ६.३० वा. ठाणे पूर्व येथील खाडीकिनारी पक्षी निरीक्षण केले जाईल. सकाळी ११ वा. अमुर फाल्कन या ससाण्याच्या जातीच्या संवर्धनाविषयी डॉ. दीपक आपटे संशोधन सादर करतील. ११.३० वा. शहरी पक्ष्यांवर आधारित सत्र होईल. दुपारी १२.२५ वा. शास्त्रज्ञ डॉ. गोल्डीन कॉड्रोज हे किनारपट्टीवरील पक्ष्यांच्या संवर्धनात स्थानिकांचा सहभाग याबाबत सांगतील.पक्षी आणि आपण या विषयावरील सत्रात दुपारी बीएनएचएसचे शास्त्रज्ञ डॉ. राजू कसंबे हे पाणथळ जागांमुळे पक्षी संवर्धन कसे झाले आणि त्यात स्थानिकांचा सहभाग यावर सादरीकरण करतील.>या संमेलनात हौशी पक्षिमित्रांचेही सादरीकरण होणार आहे. त्यात ठाण्यातील घोडबंदर परिसरात राहणाºया सीमा राजशिर्के यांचे खिडकीतून दिसणाºया पक्ष्यांवरील सादरीकरण हा कुतुहलाचा विषय असेल. सर्वसामान्य गृहिणीने निसर्गाशी नाते कसे जोडले याचा उलगडा यातून होईल. तसेच, शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असलेल्या डोंबिवली बर्ड रेसवरही सादरीकरण होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेbirds sanctuaryपक्षी अभयारण्य