पेट्रोलपंप घोटाळा प्रकरणातील तपासात ओडिशातील आणखी काही पंपांची नावे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 04:35 IST2017-09-21T04:35:17+5:302017-09-21T04:35:19+5:30

पेट्रोलपंप घोटाळाप्रकरणातील तपासात, ओडिशातील आणखी काही पंपांची नावे पुढे आली आहेत. त्या पंपांच्या तपासासाठी गेलेल्या ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला पावसामुळे मर्यादा आल्या आहेत.

In connection with the petrol pump scam case, the names of some other pumps in Odisha were disclosed | पेट्रोलपंप घोटाळा प्रकरणातील तपासात ओडिशातील आणखी काही पंपांची नावे उघड

पेट्रोलपंप घोटाळा प्रकरणातील तपासात ओडिशातील आणखी काही पंपांची नावे उघड

ठाणे : पेट्रोलपंप घोटाळाप्रकरणातील तपासात, ओडिशातील आणखी काही पंपांची नावे पुढे आली आहेत. त्या पंपांच्या तपासासाठी गेलेल्या ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला पावसामुळे मर्यादा आल्या आहेत. याचदरम्यान, मुंबईतून रोह्यातील एक पेट्रोलपंप चालक शिवशंकर दुबेच्या (५६) मुसक्या आवळल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. मंगळवारी कुर्ल्यातून दुबे या रोह्यातील पेट्रोलपंप चालकासह यापूर्वी अटक केलेल्या विनोद आहिरे यांना न्यायालयात बुधवारी हजर केले होते. या वेळी न्यायालयाने विनोदला गुरुवारपर्यंत, तर दुबेला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ओडिशातून अटक केलेल्या तंत्रज्ञाच्या चौकशीतील पंपांच्या तपासणीसाठी गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले असून त्यांना पावसामुळे मर्यादा येत आहेत.

Web Title: In connection with the petrol pump scam case, the names of some other pumps in Odisha were disclosed