काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपात

By Admin | Updated: January 6, 2017 06:07 IST2017-01-06T06:07:54+5:302017-01-06T06:07:54+5:30

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक गोदू कृष्णानी, अनू मनवानी व राष्ट्रवादीच्या नगरसेविका कमला कृष्णानी यांनी खासदार कपिल पाटील

Congress, NCP corporator, BJP | काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपात

काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपात

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक गोदू कृष्णानी, अनू मनवानी व राष्ट्रवादीच्या नगरसेविका कमला कृष्णानी यांनी खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षांचे विद्यमान नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत या वेळी कुमार आयलानी यांनी दिले.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांत प्रवेशसत्र सुरू झाले. सर्वाधिक विद्यमान नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला असून त्यापाठोपाठ भाजपा व शिवसेनेने बाजी मारली आहे. ओमी कलानी टीमच्या प्रवेशाचा तिढा सुटत नसल्याने भाजपासह शिवसेना, साई व रिपाइं पक्षात खळबळ उडाली आहे. त्यादरम्यान पप्पू कलानी यांचे जुने मित्र व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक कृष्णानी त्यांची पत्नी कमला तसेच स्वीकृत नगरसेवक अनू मनवानी यांनी भाजपात कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. (प्रतिनिधी)

Web Title: Congress, NCP corporator, BJP