शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्ये करवाढीविरोधात काँग्रेस, मनसेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 20:11 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर करवाढ करून सामान्य नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप करीत काँग्रेस व मनसेने पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी करवाढीविरोधात तीव्र आंदोलन छेडले.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर करवाढ करून सामान्य नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप करीत काँग्रेस व मनसेने पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी करवाढीविरोधात तीव्र आंदोलन छेडले. भाजपाला एकहाती सत्ता मिळविल्याचा माज आला असून, त्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यांनी बहुमताच्या जोरावर मालमत्ता करासह पाणीपट्टीत दरवाढ करून नवीन घनकचरा शुल्क सामान्य नागरिकांच्या माथी मारले.तसेच भाडेतत्त्वावरील मालमत्ता करांत कपात करून व्यावसायिकांना झुकते माप दिले. भाजपाच्या या दुजाभावामुळे नागरिकांवर दरवर्षी वाढीव कराच्या माध्यमातून सुमारे १ ते दीड हजार रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. भाजपाने आपल्या कार्यकाळात नागरिकांना अच्छे दिन नव्हे तर बुरे दिन दाखविण्यास सुरुवात केली आहे. सरकारी अनुदानात मिळालेले शेकडो कोटींचे सरकारी अनुदान विकासकामांसाठी मिळालेले असताना ते गेले कुठे, असा आरोप करीत काँग्रेस व मनसेने काळ्या फिती लावून करवाढीविरोधात पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन छेडले. यावेळी सत्ताधारी भाजपाविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली.आंदोलनात काँग्रेसच्या माजी उपमहापौर नूरजहाँ हुसेन, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, महिला जिल्हाध्यक्ष लीला पाटील, गटनेता जुबेर इनामदार, नगरसेवक राजीव मेहरा, अश्रफ शेख, माजी नगरसेविका सुनीता पाटील, युवा जिल्हा उपाध्यक्ष राकेश राजपुरोहित, पदाधिकारी फारुक शेख, अंकुश मालुसरे, उमर कपूर, राजकुमार मिश्रा तसेच मनसे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे, सचिव नरेंद्र पाटोळे, उपशहराध्यक्ष शशी मेंडन, हेमंत सावंत, दिनेश कनावजे, महिला शहराध्यक्ष पुतूल अधिकारी, मनविसे रॉबर्ट डिसोझा, सचिन पोपळे आदी पदाधिकारी व कार्यर्त्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :MNSमनसेMira Bhayanderमीरा-भाईंदर