शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

"मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक संकटात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 20:24 IST

अच्छे दिनचे गाजर दाखवत देशामध्ये मोदी सरकार सत्तेवर आले, परंतु त्यांना देश चालवता आला नाही हे गेल्या ७ वर्षांपासून जनता अनुभवतेय, काँग्रेसची टीका.

"अच्छे दिन चे गाजर दाखवत देशामध्ये मोदी सरकार सत्तेवर आले खरे परंतु त्यांना देश चालवता आला नाही हे गेल्या ७ वर्षांपासून गोरगरीब जनता अनुभवत आहे," अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे केंद्रीय सचिव तथा महाराष्ट्र सहप्रभारी बी.एम. संदीप यांनी केली. भाईंदरच्या उत्तन येथील महागाई, बेरोजगारी विरोधात काँग्रेस तर्फे जनजागृती अभियानात ते बोलत होते. "देशाचा जीडीपी दर घसरला असला तरी गॅस-डिझेल-पेट्रोल दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करून देशात महागाई वाढवली, बेरोजगारीने युवा वर्ग त्रस्त झाले आहेत, केंद्रीय मंत्री प्रत्येक खात्यात अपयशी ठरले आहेत, देश उभारणीत काँग्रेसची महत्त्वाची भूमिका आम्ही निर्माण केले त्या सरकारी कंपन्या व उद्योग विकण्याचे काम करीत आहेत असा आरोप केला," संदीप यांनी केला.उद्योग-धंदे बंद पडत चालले असून  नोटबंदी सारखे निर्णय घेऊन देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी एक वर्ष लावले, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याने मोदींना माघार घ्यावी लागली. कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यविषयक नियोजन न केल्याने देशात लाखो मृत्यू झाले, काँग्रेस तर्फे "कोविड न्याय" अभियान राबविण्यात येणार असून कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.माजी आमदार मुझफ्फर हुसेन म्हणाले की , मोदी सरकारचे अपयश देशवासीयांना जनजागृती अभियानाद्वारे सांगणार असून चुकीच्या धोरणामुळे देशात महागाई, बेरोजगारी वाढली. शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांना याचा फटका बसला आहे . केवळ भांडवलदार, मोठमोठ्या उद्योगपतींना खुश करण्यासाठी मोदी काम करीत असून  मनमानीने निर्णय घेतले गेल्याने देश रसातळाला गेल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा