इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे शहापुरात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST2021-07-14T04:45:38+5:302021-07-14T04:45:38+5:30

शहापूर : इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढ विरोधात शहापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी शहापुरात आंदोलन करण्यात आले. ...

Congress agitates in Shahapur against fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे शहापुरात आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे शहापुरात आंदोलन

शहापूर : इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढ विरोधात शहापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी शहापुरात आंदोलन करण्यात आले. जिल्हा नेते दयानंद चोरघे व तालुका अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली पार्थसारथी पेट्रोल पंपासमोर झालेल्या आंदोलनाच्या प्रसंगी तालुक्यातील ज्येष्ठ नेते नारायण वेखंडे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र परटोळे, लक्ष्मण घरत, महिला तालुकाध्यक्ष संध्या पाटेकर, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अंकुश भोईर, दशरथ तारमले, भास्कर जाधव, रामचंद्र जोशी, महेंद्र आरज, रवी भोईर, देवेंद्र भेरे, संतोष साळवे, शैलेश राऊत, सुनील महाजन, पद्माकर वरकुटे, विश्वास गोरे, जयवंत पाटेकर, माया मगर, राम वाघ, निशांत भोईर, सिद्धार्थ धानके, अश्विन घरत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, ये-जा करणाऱ्या नागरिकांना पत्रके वाटून त्यांच्याकडून इंधन दरवाढ विरोधात सह्या घेऊन निषेध नोंदविला जात होता.

Web Title: Congress agitates in Shahapur against fuel price hike