जिल्हा क्रीडा वर्तुळातून सुवर्ण पदक विजेता रुद्रांशचे अभिनंदन!
By सुरेश लोखंडे | Updated: October 2, 2023 21:44 IST2023-10-02T21:43:33+5:302023-10-02T21:44:13+5:30
देशासह राज्य आणि जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे भावनिक उद्गार बारटक्के यांनी यावेळी काढले.

जिल्हा क्रीडा वर्तुळातून सुवर्ण पदक विजेता रुद्रांशचे अभिनंदन!
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणारा ठाणे जिल्ह्याचा खेळाडू रुद्रांश पाटील यांच्यासह त्याचे वडील पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि आई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांचा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी सूवर्णा बारटक्के यांनी या आज येथे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. देशासह राज्य आणि जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे भावनिक उद्गार बारटक्के यांनी यावेळी काढले.
आता रुद्राक्ष पाटील हा एक भारतीय क्रीडा नेमबाज म्हणून जागतिक पातळीवर नावारुपाला आहे. त्याने नेमबाजी श्वचषकात पदके जिंकली आहेत. तो 10 मीटर एअर रायफलमध्ये प्रथम क्रमांकावर होता. 2022 ISSF जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याने पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.