शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शाळांची अवस्था दयनीय, तरीही हॅण्डवॉशसाठी दीड कोटींची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 06:52 IST

शिक्षण विभागाचा प्रस्ताव; महासभेच्या मंजुरीची प्रतीक्षा

ठाणे : ठाणे महापालिका शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस घसरत आहे. इमारतींची अवस्था तशी फार चांगली नसून स्वच्छतागृहांची दैना झाली आहे. भिंतीचे पोपडे निघत आहेत, अनेक शाळांचा पुनर्विकास रखडलेला आहे, पटसंख्या कमी झाल्याने अनेक वर्ग बंद करण्यात येत आहेत, असे असताना शाळांचा दर्जा उचांवण्याऐवजी शिक्षण विभागाने जे विद्यार्थी शाळेत शिल्लक आहेत, त्यांचे किमान हात स्वच्छ राहावेत या उद्देशाने हॅण्डवॉशच्या नावाखाली १ कोटी ३९ लाखांची उधळण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.ठाणे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा पट हा मागील काही वर्षांत खालावलेला आहे. ३७ हजारांहून अधिक असलेली विद्यार्थ्यांची संख्या ही ३० हजारांच्या आसपास घसरली आहे. शाळेच्या इमारतींची अवस्था नाजुक झाली आहे, स्वच्छतागृहांची अवस्थाही न बघितलेलीच बरी. असे असताना आता हॅण्डवॉशचा नवा फॉर्मुला शिक्षण विभागाने पुढे आणला आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागून त्यांचे आरोग्य सृदृढ राहावे यासाठी प्रत्येक शाळेच्या इमारतीत हर्बल हॅण्डवॉश जेल पुरविण्याची गरज असल्याचे शिक्षण विभागाने आपल्या प्रस्तावात नमूद केले आहे.असा करणार खर्च : पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग ७८ इमारतींमध्ये भरत आहेत. प्रत्येक मजल्यावरील स्वच्छतागृहांच्या शेजारी किमान २९० हॅण्डवॉश डिस्पेन्सर मशिनची गरज असल्याचे म्हटले आहे. एका यंत्रात एक लिटर जेल असून तो संपल्यानंतर पुन्हा भरला जाणार आहे. पालिकेच्या १२० प्राथमिक आणि २१ माध्यमिक शाळांसाठी दरमहा प्रति युनिट दोन लिटर जेल लागेल, असा अंदाज शिक्षण विभागाने बांधला आहे. त्यात उन्हाळी आणि हिवाळी सुटी वगळण्यात आली, हे नशीब म्हणावे लागणार आहे.सुट्यांचे हे महिने वगळता उर्वरीत १० महिने शाळा कार्यरत असते. महिन्याकाठी ५८० याप्रमाणे १० महिन्यांसाठी ५ हजार ८८०० पाऊच लागतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. त्यानुसार मशिनच्या खरेदीसाठी २ लाख २२ हजार रु पये लागणार असून दोन वर्षांत ११ हजार ६०० पाऊचसाठी १ कोटी ३७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. यासाठी १ कोटी ३९ लाखांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे अशा सुपीक कल्पनासाठी पालिकेने अर्थसंकल्पात तब्बल २१ कोटी ६९ लाखांची तरतूद केली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाEducationशिक्षणSchoolशाळा