शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

श्रमाला प्रतिष्ठा ही संकल्पनाच रुजलेली नाही - मिलिंद रानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 02:37 IST

श्रमाला प्रतिष्ठा ही संकल्पनाच भारतात नाही. श्रमिक व कष्टकरीवर्गाला कमी व तुच्छ लेखण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे.

- मुरलीधर भवार कल्याण : श्रमाला प्रतिष्ठा ही संकल्पनाच भारतात नाही. श्रमिक व कष्टकरीवर्गाला कमी व तुच्छ लेखण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी प्रभावी चळवळ उभारण्याची गरज आहे. सरकारने केलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे, असे मत कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी २२ सप्टेंबर या श्रमप्रतिष्ठा दिनानिमित्त व्यक्त केले.रानडे म्हणाले की, ‘आपल्याकडे शारीरिक काबाडकष्टाच्या कामाला काहीच किंमत नाही. मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाची सुरक्षितता नाही. मॅनहोलमध्ये आकंठ बुडून ते त्यातील घाण काढतात. मात्र, बाहेर आल्यावर अंघोळीसाठी साधी पाण्याचीही व्यवस्था नसते. शिवाय, विविध वायूंमुळे त्यांचा जीव गुदमरून मृत्यू होऊ शकतो. सफाई कामगारांच्या आरोग्याविषयी अनास्था आहे. इतकेच काय तर सुरक्षारक्षकांनाही आठ तासांऐवजी १२ तासांची ड्युटी करावी लागते. साप्ताहिक सुटीही दिली जात नाही. एवढे करूनही त्यांना सात ते आठ हजार इतका तुटपुंजा पगार मिळतो. राज्यात किमान वेतन कायदा लागू आहे. त्यानुसार, किमान १४ हजार रुपये वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र, हा कायदा कागदावरच आहे. त्याची अंमलबजावणी करणाºयांवर कारवाई होत नाही.’‘घरातील गृहिणीच्या कष्टाचे मोजमाप होत नाही. याबाबतीत सगळी श्रमाची किंमत पुरुषांच्या खात्यात जमा होते. त्यांचे काम महत्त्वाचे समजले जाते’, असे रानडे म्हणाले. लांब पल्ल्यांची मालवाहतूक करणारे ट्रक, ट्रेलरवरील वाहनचालकांना मदतीला क्लीनर दिला जात नाही. हॉटेलमध्ये भांडी घासणाºयांना अत्यल्प पगार दिला जातो. वीटभट्टीवरील कामगाराला तर वेठबिगार म्हणून राबवून घेतले जाते. गुराढोरासारखे काम करूनही मालक तुच्छ वागणूक देतात. कामाच्या ठिकाणी जीवाची सुरक्षितता पुरवली जात नाही, अशी खंत रानडे यांनी व्यक्त केली. रॅम्पवॉक करताना मॉडेलचा पाय मुरगळला, तर त्याची बातमी होते. मात्र, कष्टकरी महिला कामगारांच्या पायात खिळा घुसून ती जखमी झाली, तर त्याची बातमी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असेही ते म्हणाले़>दलित चळवळ प्रगल्भ होती़़़उत्तर प्रदेशात इतका जातीयवाद होता की, अनेकांना चळवळ उभी करताना व नेतृत्व करताना आडनावे सोडावी लागली. चंद्रशेखर व जयप्रकाश नारायण यांनी आपली आडनावे लावली नाहीत. आपल्याकडील दलित चळवळ प्रगल्भ होती.आता तिच्या मागण्या आणि विचार बदललेले आहे. सत्तेच्या जवळ गेल्याने हा बदल झाला आहे. यापूर्वी त्यांच्या मागण्या वेगळ्या होत्या. हे देखील तितकेच खरे आहे. त्यांच्या चळवळीचे ध्येय आणि उद्दिष्ट हे प्रतिष्ठा मिळवण्यासाठीचेच होते. त्यात श्रमाचा मुद्दाही महत्त्वाचा होता, असे रानडे यांनी सांगितले.