ठाण्यामध्ये यंदा पुन्हा ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ संकल्पना
By Admin | Updated: March 26, 2017 04:30 IST2017-03-26T04:30:40+5:302017-03-26T04:30:40+5:30
अत्यल्प प्रतिसादामुळे फसलेली ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही संकल्पना यंदा पुन्हा गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेत राबवली

ठाण्यामध्ये यंदा पुन्हा ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ संकल्पना
ठाणे : अत्यल्प प्रतिसादामुळे फसलेली ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही संकल्पना यंदा पुन्हा गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेत राबवली जाणार आहे. यंदा ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी आयोजक कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास’च्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या स्वागतयात्रेत तरुणांचा सहभाग मोठ्या संख्येने असावा, यासाठी ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही स्पर्धा झाली. स्वागतयात्रेच्या निमित्ताने राबवल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये त्याचा समावेश होता. मात्र, स्पर्धेची संकल्पना अनेकांपर्यंत न पोहोचल्याने व काहींपर्यंत ती पोहोचूनही स्पष्ट न झाल्याने केवळ सात स्पर्धकांचे ३१ सेल्फी प्राप्त झाले होते. त्यामुळे सात स्पर्धकांपैकी पाच जणांना बक्षीस कसे द्यायचे, असा सवाल परीक्षकांना पडला होता. यंदा ही स्पर्धा यशस्वीपणे राबवण्यासाठी आयोजकांचे प्रयत्न आहेत. या स्पर्धेच्या तांत्रिक बाबी स्पष्ट झाल्यास स्पर्धेत सहभाग घेता येईल, असे तरुणांनी सांगितले.
‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास’ आणि ‘फोटो सर्कल सोसायटी’ यांच्या वतीने स्वागतयात्रेच्या छायाचित्रणाची स्पर्धा होणार आहे. यात ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा २०१७’ तसेच ‘नववर्ष स्वागतयात्रा छायाचित्र स्पर्धा २०१७’ अशा दोन स्पर्धा होतील. या दोन्ही स्पर्धांत फक्त ठाणे महापालिका हद्दीत होणाऱ्या स्वागतयात्रांमधील छायाचित्रेच स्वीकारली जातील. ‘नववर्ष स्वागतयात्रा छायाचित्र स्पर्धा २०१७’ यासाठीची छायाचित्रे ८ इंच बाय १२ इंच आकारात असावी आणि ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ या स्पर्धेसाठी २ी’ा्री८ं३१ं@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेलवर छायाचित्र पाठवण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धेत काढण्यात आलेली छायाचित्रे १ व २ एप्रिल या दोन दिवशी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत ठामपा क्र. १९ समोर, विष्णूनगर, नौपाडा, ठाणे येथे स्वीकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)