शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

धरमतर खाडीतील प्रदूषणावर पुन्हा समितीचा उतारा, सलग तीन समित्या स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 06:39 IST

रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीत निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्योत्पादन कमी होऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

- नारायण जाधवठाणे : रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीत निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व पीएनपी कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्योत्पादन कमी होऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. याबाबत, गेल्या २० वर्षांपासून अनेकदा आंदोलने झाली. यावर उपाय म्हणून अखेर मच्छीमारांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा समितीचा उतारा शोधला आहे. यानुसार, कोकण कृषी विद्यापीठातील संशोधन अधिकारी डॉ. विवेक वर्तक यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश असलेली नऊसदस्यीय समिती गुरुवारी स्थापन केली आहे.विशेष म्हणजे यापूर्वीही विभागाने दोनदा समित्यांचे गठण करून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. मात्र, तरीही खाडीतील प्रदूषण आणि कमी होणारे मत्स्योत्पादन आणि त्यामुळे उद्भवणाºया मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यास मत्स्यव्यवसाय विभागास अपयश आले आहे.महाराष्ट्र शासनाने बाधितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ९ जुलै २०१४ रोजी डॉ. चंद्रप्रकाश प्रमुख वैज्ञानिक केंद्रीय मच्छीमार शिक्षा संस्थान वर्सोवा-अंधेरी (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.त्यानंतर, निप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात जेएसडब्ल्यू स्टील कंपनी आणि पीएनपीकडून होणाºया प्रदूषणासाठी पुन्हा एकदा २४ फेबु्रवारी २०१६ रोजी आणखी एक समिती नेमण्यात आली. आता पुन्हा डॉ. विवेक वर्तक यांच्या अध्यक्षतेखील समिती नेमली आहे.साडेतीन हजार मच्छीमारांवर गदानिप्पॉन डेन्रो इस्पात अर्थात आताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी धरमतर खाडीकिनारी असलेल्या जेटी व बार्जेसद्वारे मालवाहतूक करते. यामुळे धरमतर खाडीच्या १३५ मीटर रु ंदीच्या मध्यवर्ती पट्ट्यात जलवाहतुकीला शासनाने परवानगी दिली आहे. ही परवानगीच आता पेण व अलिबाग तालुक्यांतील ४८ गावांतील सुमारे साडेतीन हजार स्थानिक मच्छीमारांच्या जीवावर उठली आहे.मिठागरे, भातशेती संकटातमालवाहू बार्जेस व स्पीड बोटींची दिवसरात्र चालणारी रेलचेल, कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी खाडीत सोडल्याने होणारे जलप्रदूषण वाढून मत्स्योत्पादनाबरोबरच लाटांच्या प्रहारामुळे फुटणारी समुद्रतटीय खारभूमी, संरक्षक बंधारे, नापीक भातशेती अशा असंख्य समस्या सदर भागात उद्भवल्या आहेत.समितीची कार्यकक्षाया समितीस खाडीत जलप्रदूषण वाढले आहे काय, मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन संपले आहे काय, बाधित कुटुंबांची संख्या व झालेले नुकसान, धरमतर खाडीसह आसपासच्या किनाºयांच्या प्रदूषणात औद्योगिक सांडपाण्यामुळे वाढ झाली आहे काय, बाधित माशांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठीच्या उपायांचा अहवाल दोन टप्प्यांत सादर करावयाचे आहेत.

टॅग्स :IndiaभारतMumbaiमुंबई