शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

जातप्रमाणपत्राचा पाठपुरावा आयुक्तांनाही करावा लागणार

By admin | Updated: January 13, 2017 06:36 IST

नगरपालिकांसह पंचायत समित्या, जिल्हा परिषदांसह महापालिकांच्या निवडणुकांत

नारायण जाधव / ठाणेनगरपालिकांसह पंचायत समित्या, जिल्हा परिषदांसह महापालिकांच्या निवडणुकांत अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या आरक्षित जागांवर निवडणूक लढवून निवडून येणाऱ्या उमेदवारांना आपले जातप्रमाणपत्र ६ महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. ते सादर न केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र, संबंधित जातपडताळणी समितीकडून वेळेत हे प्रमाणपत्र न मिळाल्याने काही ठिकाणी संबंधिताचे सदस्यत्व रद्द झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही अडचण लक्षात घेऊन आरक्षित जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना विहित मुदतीत त्यांचे जातप्रमाणपत्र मिळावे, यासाठी संबंधित महापालिकांच्या आयुक्तांसह नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही पाठपुरावा करावा, असे नवे आदेश नगरविकास विभागाने नुकतेच काढले आहेत. यामुळे येत्या फेबु्रवारी महिन्यात होणाऱ्या १० महापालिकांसह २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांमध्ये आरक्षित जागांवर निवडणूक लढवणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.आतापर्यंत आपले सदस्यत्व बाद होऊ नये, म्हणून निवडून आलेल्या सदस्यांकडूनच संबंधित विभागीय जातपडताळणी समितीकडे जातप्रमाणपत्रासाठी पाठपुरावा केला जात होता. त्याचे एकट्याचे प्रयत्न कमी पडत असल्याने त्यास अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता नगरपालिका, महापालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये आरक्षित जागांवर निवडून येणाऱ्या सदस्यांच्या नावासह त्यांचे प्रभाग, ते कोणत्या जातीचे आहेत, ते कोणत्या तारखेस निवडून आले व त्यांचे जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत कधी संपत आहे, याची माहिती सर्व तपशिलासह वेळेत विभागीय जातपडताळणी समितीकडे पाठवून त्याचा तातडीने पाठपुरावा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांना शासनाने दिले आहेत. यासाठी संबंधित सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागासह आदिवासी विकास विभागानेही संबंधित विभागीय जातपडताळणी समित्यांनाही अशा सदस्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत देण्याचे बंधन घालावे, असे नगरविकास विभागाने सूचित केल्याचेही सूत्रे म्हणाली. नुकत्याच निवडणूक झालेल्या नगरपालिकांमध्ये आरक्षित जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांनाही हे आदेश लागू आहेत.जातप्रमाणपत्राच्या पाठपुराव्यासाठी उमेदवारांना आता जिल्हाधिकारी आणि आयुक्तांच्या पाठपुराव्याचे पाठबळ मिळणार असल्याने नगरविकास विभागाच्या या निर्णयाचे त्यांच्याकडून सर्वत्र स्वागत होत आहे. पंचायतीतील उमेदवारांनाही फायदाराज्यात महापालिकांमध्ये अनुसूचित जातीचे १७२, जिल्हा परिषदेत १८९ तर पंचायत समितीत ३८६प्रभाग आहेत. तसेच महापालिकांमध्ये अनुसूचित जमातीचे ३८, जिल्हा परिषदेत १५६आणि पंचायत समितीत २९३ प्रभाग आरक्षित आहेत. या सर्व प्रभागात निवडणूक लढवून जिंकून येणाऱ्या उमेदवारांना हा निर्णय दिलासा देणारा आहे.