शहरातील हुक्का पार्लर, अनधिकृत बॅनर्स-होर्डिंग्जवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 09:11 PM2018-10-23T21:11:20+5:302018-10-23T21:11:46+5:30

सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीतंर्गत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी दिल्या.

Commissioner of strict action against Hooka Parlor, Unauthorized Banners - Hurdings in the city | शहरातील हुक्का पार्लर, अनधिकृत बॅनर्स-होर्डिंग्जवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

शहरातील हुक्का पार्लर, अनधिकृत बॅनर्स-होर्डिंग्जवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

Next

ठाणे : शहरातील हुक्का पार्लर तसेच अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंगवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज दिले.
महापालिका मुख्यालयात अधिका-यांच्या आणि विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हुक्का पार्लरसंदर्भात राज्य शासनाने केलेल्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.त्याचप्रमाणे शहरातील अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्याबरोबरच संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी आज सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.

सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीतंर्गत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी दिल्या.

Web Title: Commissioner of strict action against Hooka Parlor, Unauthorized Banners - Hurdings in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.