आयुक्त सौरभ राव यांनी हाती घेतला झाडू, सफाईचा संदेश देत नागरिकांशी साधला संवाद

By अजित मांडके | Published: April 6, 2024 03:34 PM2024-04-06T15:34:29+5:302024-04-06T15:34:48+5:30

भारतीय नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

Commissioner Saurabh Rao took up the broom and interacted with the citizens giving the message of cleanliness | आयुक्त सौरभ राव यांनी हाती घेतला झाडू, सफाईचा संदेश देत नागरिकांशी साधला संवाद

आयुक्त सौरभ राव यांनी हाती घेतला झाडू, सफाईचा संदेश देत नागरिकांशी साधला संवाद

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नौपाडा परिसरात शनिवारी  महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६.३० वाजल्यापासून स्वच्छता मोहिमेस सुरूवात झाली. श्रीकौपिनेश्वर मंदिर, भाजी मंडई परिसर, जांभळीनाका परिसर, स्टेशन रोड तसेच तलावपाळी परिसरातील साफसफाई करुन परिसर पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आला. यावेळी राव यांनी स्वतः हातात झाडू घेवून अंतर्गत रस्त्यांची, गल्ल्यांची साफसफाई केली. भारतीय नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्त  संदीप माळवी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे, नौपाडा परिमंडळचे उपायुक्त् शंकर पाटोळे, उपायुक्त अनघा कदम, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केस्वावानी, सहायक आयुक्त सोपान भाईक, वैदकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.
राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत त्यांनी स्वत: हातात झाडू घेवून अंतर्गत रस्त्यांची, गल्ल्यांची साफसफाई केली. यावेळी कौपिनेश्वर मंदिर ते मराठी ग्रंथ संग्रहालय परिसराची पाहणी केली. या परिसरातील दुकानांच्या पाठी असलेल्या छोटया गल्ल्यांची सफाई केली. तसेच मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत गल्ल्यांही नियमित स्वच्छ करण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच तलावपाळी येथील सॅटिस पुलाच्या खाली असलेले राडारोडा त्वरीत उचलण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. 

नागरिकांशी साधला संवाद
तलावपाळी परिसरात सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी नियमितपणे फूटपाथची सफाई होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, तलावपाळी परिसरात काही नागरिक हे कबुतरांना दाणे खायला घालतात, त्यामुळे परिसर अस्वच्छ होतोच, परंतु कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो. त्याचप्रमाणे रस्त्यांवर पाळीव प्राणी घेवून येणारे नागरिक हे प्राण्यांची विष्ठा उचलत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या. यावर आयुक्तांनी याबाबत निश्चितच उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी कबुतरांना दाणे घातले जातात त्या परिसरात फलक लावण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

ॲम्फीथिएटरची केली पाहणी
तलावपाळी परिसरात सेंट जॉन शाळेच्यासमोरील भागात महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ॲम्फीथिएटरची पाहणी केली. यावेळी येथील नागरिकांशी नियमित स्वच्छता होते का याबाबत विचारणा करीत राव यांनी त्यांच्याशी संवाद साधला. स्वच्छतेबाबत नागरिकांनी महापालिकेचे कौतुक केले. परंतु रस्त्यावर फेरीवाले व त्यांचे कुटुंबीय झोपत असून सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे सांगत यावर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. या बाबीची दखल घेवून रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांना निवारा शेडमध्ये पाठविता येईल का याबाबतची चाचपणी करुन फूटपाथ नागरिकांसाठी मोकळे राहतील या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबधितांना दिल्या.

Web Title: Commissioner Saurabh Rao took up the broom and interacted with the citizens giving the message of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.