शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

भिवंडीत मंत्री कपिल पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 19:51 IST

Bhiwandi News: भिवंडीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि राज्य सरकारमधील मंत्री कपिल पाटील यांच्यात सल्ला मसलत व आरोप प्रत्यारोपांमधून या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी अधिकच पाहायला मिळाली.  

-नितिन पंडीत भिवंडी - जो विद्यार्थी शाळेच्या बाहेर बसून शिकला त्या विद्यार्थ्याने देशाची राज्यघटना लिहिली हे आमच्यासाठी गौरवाचे असून डॉ बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळेच देशात सर्वश्रेष्ठ अशी लोकशाही नांदत आहे असे गौरवोद्गार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीत मनपा मुख्यालयासमोर उभारलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उदघाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शुक्रवारी व्यक्त केले . संविधानामुळेच भारत देश एकसंघ आहे त्यामुळे प्राण गेला तरी बेहत्तर पण संविधान बदलून देणार नाही अशी शपथ घेण्याचा सल्ला मंत्री आव्हाड यांनी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित भीम अनुयायांना दिला . त्यानंतर ओबीसी आरक्षणावर बोलतांना मंत्री आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पक्ष बाजूला ठेवून केंद्र सरकारमुळे ओबीसींचे आरक्षण रद्द होत आहे याचा निषेध करण्याचा सल्ला दिला.

त्यांनतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्याच्या मुलाला मिळाली हे माझे भाग्य आहे आणि हीच संविधानाची ताकद आहे. आता इंदू मिलच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा लवकरात लवकर बसवावा अशी विनंती वजा कोपरखळी मंत्री पाटील यांनी मंत्री आव्हाड तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली. तसेच राज्याचे गृहनिर्माण व नगरविकास मंत्र्यांनी ठाणे शहराचा विकास केला मात्र भिवंडी शहराचा विकास अजूनही हवा तास झालेला नाही त्यामुळे शहर विकासात समानता आणून भिवंडीच्याही विकासाकडे राज्य शासनाने लक्ष द्यावे असा खोचक सल्ला देखील मंत्री पाटील यांनी यावेळी मंत्री आव्हाड व शिंदे यांना लगावला. त्यांनतर कुठेही काही झाले तरी जो तो उठतो आणि खासदारांवर आरोप करतो अशी खंत मंत्री पाटील या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली. त्यामुळे सल्ला मसलत व आरोप प्रत्यारोपांमधून या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी अधिकच पाहायला मिळाली.  

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलJitendra Awhadजितेंद्र आव्हाडbhiwandiभिवंडी