शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

क्लस्टरचा नारळ फुटलाच नाही; गावठाण कोळीवाड्यांच्या विरोधामुळे योजना लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:08 AM

ठाणे शहरासाठी महत्त्वाची ठरणाऱ्या क्लस्टर योजनेचा पहिला नारळ आॅक्टोबर महिन्यात फोडणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला. परंतु,नोव्हेंबर महिना संपत आला तरी क्लस्टरचे कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच झाले नसल्याचे उघड झाले आहे.

ठाणे : ठाणे शहरासाठी महत्त्वाची ठरणाऱ्या क्लस्टर योजनेचा पहिला नारळ आॅक्टोबर महिन्यात फोडणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला. परंतु,नोव्हेंबर महिना संपत आला तरी क्लस्टरचे कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच झाले नसल्याचे उघड झाले आहे. पहिल्या टप्प्यात चार भागांत ही योजना सुरू केली जाणार होती. परंतु, पालिकेकडे आलेल्या हरकती आणि सूचनांमुळे विलंब होत असून गावठाण आणि कोळीवाड्यांना यातून वगळण्यात येत असल्याने त्याचा सर्व्हेसुद्धा सुरू असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच क्लस्टरला विलंब होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.क्लस्टर योजना ही शहरातील ४३ सेक्टरमध्ये राबविली जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात ती ४ सेक्टरमध्ये राबविली जाणार असून त्या अतंर्गत तब्बल २३ टक्के जागा विकसित केली जाणार आहे. परंतु, या योजनेअंतर्गत केवळ घरेच उभारली जाणार नसून बाहेरून येणाºया सामावून घेतले जाणार आहे. तसेच प्रत्येक सेक्टरमध्ये कर्मशिअल हब म्हणजेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येणार असून, कम्युनिटी सेंटर, सिटी सेंटर, टाऊन सेंटरचीदेखील उभारणी करण्यात येणार आहे. शहरातील बुजलेल्या तलावांना पुनर्जीवन देतांनाच, सीआरझेड, वनविभागाच्या जागा या माध्यमातून मोकळ्या करण्याची ग्वाही आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मे २०१८ मध्ये दिली होती. त्यानुसार आॅक्टोबरअखेर पहिल्या टप्यातील कामाचा श्रीगणेशा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. यासंदर्भातील सादरीकरणसुद्धा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर केले होते.पहिल्या टप्यात चार सेक्टरमध्ये कोपरी, राबोडी, लोकमान्य नगर आणि किसनगर या भागांचा समावेश आहे. त्यानुसार या सेक्टरचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्यामध्ये लोकसंख्येच्या मानाने रुग्णालये, पोलीस ठाणे, गार्डन, आदींसह इतर सुविधा उपलब्ध आहेत. पहिल्या टप्यात २३ टक्के क्षेत्र क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केले जाणार असले तरी पुढील दोन वर्षांत ७० टक्के क्षेत्र हे क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केले जाणार आहे.हरकतींचा निपटारा होईपर्यंत क्लस्टरचा शुभारंभ अशक्य३० दिवसात नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविल्या जाणार होत्या. त्यानुसार यामध्ये गावठाण आणि कोळीवाड्यांचा समावेश करण्यात आल्याने येथील नागरिकांनी या योजनेला कडाडून विरोध केला. तसेच याच भागातून हजोरांच्या संख्येने हरकती आणि सुचनांचा पाऊस पडला. अखेर पालिकेने क्लस्टरमधून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार आॅक्टोबरमध्ये पहिल्या टप्याचा नारळ वाढविला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. परंतु आता त्यांचा हा दावा फोल ठरला आहे. पालिकेकडे आलेल्या सूचना आणि हरकती निकाली काढण्यातच पालिकेचा आता नोव्हेंबर महिनासुद्धा संपणार आहे. पालिकेकडे सुमारे १८ हजार हरकती आल्या आहेत. त्यांचा निपटारा लावण्याचे काम सध्या सुरू आहे.या हरकती निकाली काढल्या नाहीत. तर भविष्यात क्लस्टरला न्यायालयाच्या पायºयाही चढाव्या लागू शकतात, अशी भीती पालिकेच्या मनात आहे. त्यामुळेच जोपर्यंत सूचना आणि हरकतींचा निपटारा होत नाही, तोपर्यंत क्लस्टरचे पुढचे पाऊल टाकणे शक्य नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये काहीही करून पहिल्या टप्यातील चार भागांचा युआरपी प्रसिद्ध केला जाणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु, प्रत्यक्षात नारळ केव्हा वाढविला जाणार याचे उत्तर मात्र पालिकेकडे नाही.शुभारंभावरूनही राजकीय संघर्ष होण्याची शक्यताआगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून क्लस्टरचा नारळ वाढविण्याची तयारी सत्ताधाºयांनी आखली आहे. त्यानुसार किसननगर भागात पहिला नारळ फुटणार अशी चर्चाही जोर धरत आहे. परंतु, येथील क्लस्टर किचकट असून नागरिकांच्या हरकती सूचनासुद्धा जास्त असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील नारळ हा कोणतीही अडचण नसलेल्या राबोडी या भागाचा वाढविला जाणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे यावरूनसुद्धा येत्या काळात राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :thaneठाणे