मीरा भाईंदरमधील चित्रपटगृह, व्यायामशाळा, तरण तलाव, सभागृह बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 20:10 IST2020-03-14T20:09:52+5:302020-03-14T20:10:50+5:30
भाईंदरचा मॅक्सस, मीरारोडच्या कनकिया येथील पिव्हीआर, नयानगर मधील रसाज तर चेकनाका जवळील ठाकुर ही चित्रपट गृह बंद केली आहेत.

मीरा भाईंदरमधील चित्रपटगृह, व्यायामशाळा, तरण तलाव, सभागृह बंद
मीरारोड - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागु करण्यात आल्याने आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आदेश काढुन मीरा भाईंदर मधील चित्रपटगृह, सभागृह, व्यायामशाळा, तरण तलाव ३० मार्च पर्यंत बंद केले आहेत.
आज शनिवारी १४ मार्च रोजी आयुक्तांनी आदेश जारी केले असुन यात भाईंदरचा मॅक्सस, मीरारोडच्या कनकिया येथील पिव्हीआर, नयानगर मधील रसाज तर चेकनाका जवळील ठाकुर ही चित्रपट गृह बंद केली आहेत. शहरातील व्यायामशाळा, सभागृहे तसेच महापालिकेचे गोपीनाथ मुंडे क्रिडा संकुल व जीसीसी क्लब मधील जलतरण तलाव बंद केले गेले आहेत. परंतु शहरातील अन्य हॉटेल, रिसॉर्ट तसेच क्लब मधील तरण तलाव बंद करण्या बाबत प्रसिध्दी पत्रकात स्पष्टता नाही.
कोरोनाचा झपाटट्याने वाढणारा संसर्ग पाहता मॉल मधील स्वयंचलीत जीने, उद्वाहक, दुकाने, दरवाजे , ग्राहक बसतात असे टेबल, ओटा आदी ठिकाणीचे वारंवार निर्जंतुकिकरण करण्याच्या तसेच स्वच्छता गृहात साबण - पाण्याची व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.