शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे स्वच्छता अभियान जोरात; आयुक्तांनी घेतली नगरसेवकांची कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 17:44 IST

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम जोरात सुरू केली आहे.

- राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम जोरात सुरू केली आहे. त्यात थेट आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी नगरसेवकांच्या कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी पालिका मुख्यालयात केले होते.पालिकेने प्रामुख्याने आयुक्तांनी यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात गतवेळपेक्षा वरचा क्रमांक मिळविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी स्वच्छतेचे मोबाईल अ‍ॅपदेखील सुरू केले असून, त्यावर नागरिकांनी स्वच्छतेप्रती समाधान व्यक्त करायचे आहे. स्वच्छतेचा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी सर्वांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी व अधिकारी धावपळ करीत असून ते मोबाईल अॅप डाऊनलोड करणा-याचा मोबाईल क्रमांक व स्वाक्षरीची नोंद करून त्याचा अहवाल प्रशासनाला दररोज सादर करीत आहेत. त्या अहवालाच्या पडताळणी कामासाठी देखील अधिका-यांना जुंपण्यात आले आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, शिक्षक, व्यापारी व ज्येष्ठ नागरिक संघटना, गृहनिर्माण संस्था आदींमध्ये कार्यशाळा आयोजित करून लोकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती केली जात आहे.या स्वच्छतेप्रति प्रशासनाने शहरातील नगरसेवकांची १७ नोव्हेंबरला नगरभवन सभागृहात येथील कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी एकूण ९५ पैकी केवळ दोनच नगरसेवकांनी हजेरी लावल्याने नगरसेवकांची स्वच्छतेप्रति असलेली भावना त्यावेळी चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर आयुक्तांनी पुढाकार घेत शुक्रवारी पालिका मुख्यालयात नगरसेवकांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. मात्र त्यालाही सुरुवातीला नगरसेवकांनी बेताची उपस्थिती लावली. मात्र अधिका-यांनी सतत संपर्क साधल्यानंतर काही नगरसेवकांचे आगमन सुरू झाले. यानंतरही ९५ पैकी सुमारे ४० नगरसेवकांनी कार्यशाळेला हजेरी लावली. या कार्यशाळेत उपस्थित नगरसेवकांना स्क्रीनद्वारे स्वच्छतेची माहिती देण्यात आली. यावेळी प्रशासनाने नगरसेवकांना स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छतेच्या विविध प्रकारांना देण्यात येणा-या गुणांकनाविषयाची माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.जास्तीत जास्त लोकांना स्वच्छतेच्या मोबाईल अ‍ॅपचे डाऊनलोड करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन नगरसेवकांना करण्यात आले. यावेळी ज्या नगरसेवकांकडुन त्यांच्या प्रभागातील १०० टक्के स्वच्छतेचे काम केले जाईल त्या प्रभागाच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा देखील करण्यात आली. मात्र प्रभागांत कायम असलेली अस्वच्छता अनेकदा तक्रार करूनही स्वच्छ केली जात नसल्याचा सूर अनेक नगरसेवकांनी आळवला.सेनेच्या नगरसेविका स्नेहा पांडे यांनी तर भार्इंदर पुर्वेच्या आझादनगर (स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रस्तावित असलेली जागा) येथील अस्वच्छतेवर आसूड ओढीत या घाणीचे साम्राज्य पसरलेल्या ठिकाणी एका लहान मुलीची अत्याचारानंतर हत्या तर दोन दिवसांपूर्वी एका मुलीवर प्राणघातक हल्ला करून तिला तेथीलच कच-यात फेकण्यात आले. यामुळे प्रशासनाने पसरलेली घाण साफ न करताच स्वच्छतेचा बडेजाव करु नये, असे प्रशासनाला सुनावले. यावेळी महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी सभापती ध्रवकिशोर पाटील, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, नगरसचिव वासुदेव शिरवळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक