येऊर जंगलातील ३५० किलो कचऱ्याची केली साफसफाई
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 23, 2022 17:59 IST2022-10-23T17:58:58+5:302022-10-23T17:59:35+5:30
हा सर्व कचरा स्त्री मुक्ती संघटनेच्या पुनर्वापर केंद्राकडे देण्यात आला. मोहिमेच्या शेवटी, कमी कचऱ्याची जीवनशैली जगणे या कल्पनांचा समावेश करणे याबद्दल जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते.

येऊर जंगलातील ३५० किलो कचऱ्याची केली साफसफाई
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : रविवारी म्युझ फाऊंडेशनच्यावतीने येऊर जंगलातील ३५० किलो कचरा साफ करण्यात आला तर आतापर्यंतच्या या स्वच्छता मोहिमेत ५०० किलो कचऱ्याची सफाई करण्यात आल्याचे म्युझने सांगितले.
या कार्यासाठी ५० हून अधिक स्वयंसेवक एकत्र आले होते. म्युझ फाऊंडेशन आयोजित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर येथे आपल्या पंधरवड्यातील स्वच्छता मोहिमेची तिसरी फेरी संपन्न झाली. या मोहिमेत के.जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे एनएसएसचे विद्यार्थी, डॉ. बीएमएन कॉलेज ऑफ होम सायन्स आणि ठाण्यातील नागरिक सहभागी झाले होते. यात बहुतांशी प्लास्टिक, थर्माकोल, फुलांचा कचरा, बेडशीट, दरवाजा, पिशव्या, शूज, वैद्यकीय कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या आदी कचरा साफ करण्यात आला. एकूण २२ पोती कचरा साफ करण्यात आला. त्यानंतर हा सर्व कचरा स्त्री मुक्ती संघटनेच्या पुनर्वापर केंद्राकडे देण्यात आला. मोहिमेच्या शेवटी, कमी कचऱ्याची जीवनशैली जगणे या कल्पनांचा समावेश करणे याबद्दल जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते. आतापर्यंत म्युझने ५०० किलो कचऱ्यांची सफाई केली आहे.