सीबीएसई बोर्डात दहावीचे विद्यार्थी चमकले
By Admin | Updated: May 29, 2016 02:57 IST2016-05-29T02:57:37+5:302016-05-29T02:57:37+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १० वीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. ठाणेकर विद्यार्थ्यांनी यंदाही या परीक्षेत उत्तम गुण मिळवून आपली यशाची परंपरा कायम

सीबीएसई बोर्डात दहावीचे विद्यार्थी चमकले
ठाणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १० वीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. ठाणेकर विद्यार्थ्यांनी यंदाही या परीक्षेत उत्तम गुण मिळवून आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. लोकपुरम स्कूलच्या मानसी मिश्रा हिने ९८.४ टक्के मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, शाळांमध्ये मुलांचा जल्लोष सुरू आहे.
खाजगी क्लासशिवाय मिळवले यश
मी खाजगी क्लास लावला नव्हता. घरीच अभ्यास करायचे. शिक्षकांनी आणि पालकांनी मार्गदर्शन केले. नववी इयत्तेतही मी शाळेतून पहिली आले होते. पुढे जाऊन आयटीआयमध्ये प्रवेश घ्यायचा आहे.
-मानसी मिश्रा, लोकपुरम स्कूल (९८.४ टक्के)
ध्येय आधीच निश्चित केले होते
मी खूप खूश आहे. मला डॉक्टर व्हायचे असून मी ध्येय निश्चित केले होते. पुढे जाऊन एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी चांगले मार्क मिळवणे गरजेचे होते. त्यादृष्टीने मी खूप अभ्यास केला होता.
-आरु षी सिंग,
केंद्रीय विद्यालय ठाणे, (९४ टक्के)
प्रचंड मेहनतीचे फळ
मला खूप आनंद झाला आहे. एअर फोर्समध्ये जाण्याच्या दृष्टीने मी प्रचंड मेहनत केली होती. त्याचे फळ मिळाले.
- पामोली दत्ता, केंद्रीय विद्यालय ठाणे (९७.४ टक्के)
अभ्यासाचे दडपण घेतले नव्हते
बोर्डाची परीक्षा आहे म्हणून मनावर दडपण आले नव्हते. अभ्यासाचे कोणतेही टाइमटेबल केले नव्हते. दिवसाला केवळ दोन-तीन तास पण मन लावून अभ्यास करायचो. त्यामुळेच माझ्या यशाबद्दल मला खात्री होती. माझ्या यशात शिक्षकांबरोबर आईवडिलांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. पुढे जाऊन मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे.
-महेंद्र संत्रा, केंद्रीय विद्यालय ठाणे (९६ टक्के)