क्रिकेट खेळण्यावरून हाणामारी, १२ जणांवर गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: April 19, 2023 19:26 IST2023-04-19T19:26:08+5:302023-04-19T19:26:24+5:30

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Clash over playing cricket, case registered against 12 people | क्रिकेट खेळण्यावरून हाणामारी, १२ जणांवर गुन्हा दाखल

क्रिकेट खेळण्यावरून हाणामारी, १२ जणांवर गुन्हा दाखल

उल्हासनगर : कॅम्प नं-३ डॉल्फिन क्लब मैदानावर एका १२ जणांच्या टोळक्याने, मंगळवारी रात्री क्रिकेट खेळणाऱ्यांना पिटाळून मारहाण केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अलोक राय यांच्यासह १० ते १२ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 उल्हासनगर डॉल्फिन हॉटेलच्या शेजारील खुल्या मैदानावर मंगळवारी रात्री साडे बारा वाजता अमित खटर हे नातेवाईकां सोबत खेळत होते. त्यावेळी अलोक राय हा १० ते १२ जणांचे टोळके घेऊन क्रिकेट खेळण्यासाठी आला. त्याने खटर व नातेवाईकांना हमको खेलणा है, तुम लोग अभि के अभि निकल जाओ, असे बोलून हाणामारी करू लागला.

रमेश खटर त्यांचा मुलगा नातेवाईक व कामगारांचे मुले अजय दाभाडे, राहुल दाभाडे यांनाही मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी अलोक राय यांच्यासह १० ते १२ जणांच्या टोलज्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Clash over playing cricket, case registered against 12 people