शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

रुग्णांच्या सोयीसाठी सिव्हील हॉस्पीटल मेण्टल हॉस्पीटलमध्ये हलवा, मनसे करणार आरोग्य सचिवांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 3:59 PM

ठाणे : सिव्हील हॉस्पीटलच्या नुतनीकरणासाठी हे हॉस्पीटल तात्पुरते मुंब्रा - कौसा येथे हलविण्याचा प्रयत्न आहे. यामुळे रुग्णांचे फक्त हाल होणार ...

ठळक मुद्देसिव्हील हॉस्पीटल तात्पुरत्या स्वरुपात मेण्टल हॉस्पीटलला हलवा : अविनाश जाधवटोरॅण्टेला मनसेचा विरोध : अविनाश जाधवशनिवारी महारक्तदान शिबीर

ठाणे : सिव्हील हॉस्पीटलच्या नुतनीकरणासाठी हे हॉस्पीटल तात्पुरते मुंब्रा - कौसा येथे हलविण्याचा प्रयत्न आहे. यामुळे रुग्णांचे फक्त हाल होणार आहे. रुग्णांच्या सोयीसाठी हे हॉस्पीटल ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय येथे हलविण्यात यावे अशी मागणी राज्य आरोग्य सचिवांकडे केली जाणार असल्याची मनसेने गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.             शनिवारी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबीराची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला राज्य आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडे सिव्हील हॉस्पीटलच्या तात्पुरत्या स्थलांतराचा प्रश्न मांडला जाणार असल्याचे मनसे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले. सिव्हील हॉस्पीटलमध्ये ग्रामीण भागांतून रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यांना ठाणे शहरात येण्याचा सोपा मार्ग आहे. सिव्हील हॉस्पीटल मुंब्रा - कौसाला स्थलांतरीत करुन ग्रामीण भागांतून येणाऱ्या रुग्णांचा प्रशासन ताप वाढवित आहेत. त्यामुळे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मोठी जागा आहे त्या ठिकाणी हे हॉस्पीटल स्थलांतरीत करण्यात यावे अशी आमची राज्य आरोग्य सचिवांकडे मागणी आहे आणि त्यांच्याशी महारक्तदान शिबीराच्या दिवशी चर्चा केली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. रेल्वेसाठी चार एकर जागा लागणार असेल तर १६ एकर जागा का दिली जाणार आहे? तसेच, ही जागा रेल्वेला बांधू द्या, ठाणे महापालिका का बांधणार आहे? आमचे पैसे यासाठी का वाया घालविले जात आहेत? असे प्रश्न यावेळी करण्यात आले.----------------------------------टोरॅण्टेला मनसेचा विरोध : अविनाश जाधवराज्य शासन टोरॅण्टो आणत आहे, त्याला आमचा विरोध आहे. कळवा - मुंब्रर्याला टोरॅण्टो झाले तर मनसे तमाशा करेल असा इशारा जाधव यांनी दिली. जे सत्तेत आहेत तीच शिवसेना - भाजपा या टोरॅण्टोला विरोध करीत आहेत, त्यांनी आपल्या मंत्र्यांजवळ हा विषय मांडावा, त्यांच्याशी चर्चा करावी, ज्यांनी टोरॅण्टो लादले तेच बंदचे नाटक करीत आहेत, मतदानापुर्वी सहानुभूती मिळवण्याचे नाटक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेHealthआरोग्य