भिवंडीतील मौलाना आझाद नगर येथे पाणी समस्यासाठी नागरिकांचा मनपा मुख्यालयासमोर आंदोलन
By नितीन पंडित | Updated: July 12, 2024 17:47 IST2024-07-12T17:46:21+5:302024-07-12T17:47:28+5:30
या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भिवंडीतील मौलाना आझाद नगर येथे पाणी समस्यासाठी नागरिकांचा मनपा मुख्यालयासमोर आंदोलन
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील मौलाना आझाद नगर येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून नागरिकांना सध्या गढूळ व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने शुक्रवारी महानगर पालिका मुख्यालय समोर परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी नागरिकांनी पाणी दो पाणी दो च्या जोरदार घोषणाबाजी करीत पालिका परिसर दणाणून सोडला होता.सुमारे एक तास सुरू राहिलेल्या या आंदोलनात नंतर पालिका प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळास पाणी समस्या सोडविण्यात बाबत आश्वासन देण्यात आले.
मनपा प्रशासनाने जरी आश्वासन दिले असले तरी आमच्या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर याहून उग्र आंदोलन मनपा मुख्यालय समोर करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.