शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तलावांच्या दुरवस्थेला नागरिकही तितकेच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 04:16 IST

बिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर तलावाची दिवसागणिक अवस्था बिकट होत आहे. तलावाच्या पाण्याला शेवाळे धरले असून त्यात झाडेही उगवली आहेत. यामध्ये येथील जीवसृष्टी नष्ट झाली असताना तलावाच्या परिसरात वाढलेल्या झुडुपांमुळे सापांचा संचारही वाढला आहे

ठाणे - बिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर तलावाची दिवसागणिक अवस्था बिकट होत आहे. तलावाच्या पाण्याला शेवाळे धरले असून त्यात झाडेही उगवली आहेत. यामध्ये येथील जीवसृष्टी नष्ट झाली असताना तलावाच्या परिसरात वाढलेल्या झुडुपांमुळे सापांचा संचारही वाढला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. केडीएमसीच्या या तलावाचे सुशोभीकरण जुलै २००१ मध्ये तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांच्या खासदार निधीतून आणि स्थानिक नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या पुुढाकाराने झाले होते. प्रारंभी घरगुती गणपतींच्या विसर्जनाच्या सोयीसाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु तलावातील वाढते प्रदूषण पाहता स्थानिक रहिवाशांनी दाखल झालेल्या याचिकेवर हरित लवादाने मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घातली आहे. यामुळे गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, छट पूजेच्या निमित्ताने होणारे विसर्जन थांबले असले तरी तलावात कचरा टाकणे सुरूच आहे. घरातील कचऱ्याच्या पिशव्याही रस्त्यांवरून जाताना तलावाच्या दिशेने भिरकावल्या जातात. त्यामुळे बराचसा कचरा हा तलावात तसेच आजूबाजूच्या परिसरात पडत असल्याने तलाव परिसराला डम्पिंगची अवकळा प्राप्त झाली आहे.

प्रारंभी ग्रामपंचायत आणि आता केडीएमसीचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात रोगराईला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहाराद्वारे तसेच राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन तलावाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले गेले आहे. परंतु इच्छाशक्तीच्या अभावात ही समस्या आजपर्यंत जैसे थे राहिली आहे. हा तलाव प्रदूषणमुक्त राहावा तसेच त्याचे सुशोभीकरण करण्याच्या अनुषंगाने विविध खाजगी संस्था पुढाकार घ्यायला तयार आहेत यासंदर्भातले पत्र मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये केडीएमसीला देण्यात आले होते. परंतु त्या पत्रावरही आजतागायत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, महापालिकेच्या अर्थसंकल्पात तलाव सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु २७ गावांचा भाग असलेला एमआयडीसी मिलापनगर हा केडीएमसीत राहतो की महापालिकेबाहेर जातो, या शक्यतेमुळे तलावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.महापालिका क्षेत्रात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यावर मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे तसेच प्रदूषण टाळण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून मागील काही वर्षांत कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले जात आहेत. या कृत्रिम तलावांमध्ये भक्तांनी मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते. मागील वर्षी कल्याणमध्ये चार तर डोंबिवलीत १२ अशा एकूण १६ ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले होते. कल्याणमध्ये वायलेनगर येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या आवारात, कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामागे, चिंचपाडा येथील १०० फुटी रोडजवळ, तर जरीमरी तलावातील विसर्जन बंद करण्यात आल्यामुळे कल्याण पूर्वेकडील अयोध्यानगरी येथे अशा चार ठिकाणी कल्याणमध्ये भक्तांसाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यातआले होते.तर डोंबिवलीत पेंडसेनगर पंचायत विहीर, नेहरू मैदान, मानपाडा रस्त्याजवळ अयोध्यानगर येथे, शिवम रु ग्णालयाजवळ, टिळकनगर विद्यामंदिरजवळ, न्यू आयरे रोड येथील उदंचन पंपिंगजवळ, प्रगती कॉलेजजवळ, कस्तुरी प्लाझा, आयरे रोड येथील स्वामी विवेकानंद शाळेजवळ, एमआयडीसीमधील अभिनव स्कूलजवळ, तर डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकाजवळील आनंदनगर येथे आणि भागशाळा मैदानात कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. यंदाही याच ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. नैसर्गिक तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलाव हा पर्याय ठरत असलातरी त्याच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावरखर्च होत असल्याचे बोलले जाते.टीका करताना चार बोटे आपल्याकडेशहराच्या दुरवस्थेला आपण नेहमी अधिकारी, प्रशासन, राजकीय मंडळींना दोषी ठरवतो. अर्थात यात तथ्य आहे. मात्र दुसºयांवर टीकेची झोड उठवताना चार बोटे नेहमी आपल्याकडे असतात हे सामान्यांनी विसरता कामा नये. यासाठी शहर नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी ही नागरिकांचीही आहे, हेही तितकेच खरे आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका