शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
2
स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी
3
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा विजयरथ कायम! सुपर-८ मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर
4
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२४: आरोग्य उत्तम राहील, पण रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल!
5
"त्यानं भारताविरूद्ध जे केलं ते...", नसीम शाहच्या समर्थनार्थ पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात!
6
Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू?
7
भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर
8
दहशतवादाचे कंबरडे मोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश; दहशतवादी घटनांचा घेतला आढावा
9
न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली
10
भाजीपाल्याचा दुष्काळ: फरसबी, वाटाण्यासह दोडका १६० रुपये किलो, गवार, शेवग्यानेही ओलांडली शंभरी
11
'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या १९ चेंडूत सामना जिंकला
12
संसदेत बारामतीचे तीन खासदार, सुनेत्रा पवारांनी भरला राज्यसभेचा अर्ज; विराेधात कुणीच नाही
13
Wriddhiman Saha ची नवीन खरेदी; १२ व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, म्हणाला...
14
'इंडस्ट्रीत एखाद्याच्या मागून....'; सिद्धार्थने सांगितली कलाविश्वातील खटकणारी गोष्ट
15
'घरातील काम ही फक्त महिलांची जबाबदारी का?' लोकप्रिय अभिनेत्री सान्या मल्होत्राचा सवाल
16
सूर्या, रोहितला १० वर्षांनी भेटणे विशेष, सौरभ नेत्रावळकरची प्रतिक्रिया
17
१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी
18
येडीयुरप्पांविरोधात उद्या दाखल होणार चार्जशीट, निकटवर्तीय म्हणतात, ते तर दिल्लीला गेले
19
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
20
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार

पर्यावरणसंवर्धनासाठी नागरिकांचा पुढाकार महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 12:37 AM

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल : पर्यावरण दिनानिमित्त केली तीन हजार रोपांची लागवड

ठाणे : पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच खारफुटीची लागवड, वृक्षांचे पुनर्रोपण, प्लास्टिकपासून इंधननिर्मिती, कचऱ्याचे वर्गीकरण, त्यावर प्रक्रि या करणे आदी उपक्रम ठाणे महापालिकेच्या विविध विभागांच्या माध्यमातून राबवले जात आहेत. शहर स्वच्छ ठेवणे, ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून ती माझी स्वत:चीदेखील जबाबदारी आहे, असा विचार जेव्हा नागरिक करतील, तेव्हाच खºया अर्थाने ठाणे शहर हे पर्यावरणाभिमुख होईल. महापालिका प्रशासन हे शहराचे एक चाक असून दुसरे चाक नागरिक आहे. त्यांनी महापालिकेस सहकार्य केले, तर भविष्यात पर्यावरण दिन खºया अर्थाने साजरा होईल, असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जागतिक पर्यावरणदिनी व्यक्त केला.

ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर येथे करण्यात आले होते. या कार्यक्र मास स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेविका स्नेहा आंब्रे, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, ओमप्रकाश दिवटे, वर्षा दीक्षित, नगरअभियंता रवींद्र खडताळे यांच्यासह विविध संघटनांचे तसेच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास होत असताना विकासकामांत अडथळा ठरत असलेली झाडे न तोडता त्यांचे पुनर्रोपण केले जात आहे तसेच विकासकाने एक झाड तोडल्यास त्या बदल्यात त्याच्याकडून १५ झाडे लावून घेतली जात आहे. आजपर्यंत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ११ लाख झाडे लावण्यात आली आहेत. महापालिका घनकचºयाचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करत आहे. येत्या दोन वर्षांत कचºयावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून कचरा समस्या सोडवणारे शहर म्हणून ठाणे शहराची ओळख ही आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदूषण विभागाच्या वतीने हरितवाटिका उभारणी, प्लास्टिक व थर्माकोल या वस्तूंना पर्यायी वस्तूंबाबत माहिती देणाºया अ‍ॅपचे, महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन कापडी पिशव्या तयार करणे, पाण्याची गुणवत्ता राखणाºया मशीनची उभारणी, शाश्वत ध्येयप्रणाली राबवणे, स्मार्ट वॉटर मीटर अ‍ॅप आदींचे उद्घाटन स्थायी समिती सभापती राम रेपाळे व आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील पातलीपाडा येथील हिरानंदानी इस्टेट, लेक परिसर येथे तीन हजार विविध जातींच्या रोपांचे वृक्षारोपण महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.