शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये चिमुकल्यांची किलबिल पुन्हा झाली सुरू; महापालिका क्षेत्रांतील शाळा बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 01:28 IST

जिल्ह्यात ४२२ शाळा सुरू, ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या एक हजार ३४६ शाळा आहेत.

ठाणे : कोरोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास वर्षभरापासून बंद असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या शाळा कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून बुधवारपासून सुरू झाल्या. यात शहरी भाग वगळून पहिल्या दिवशी ४२२ शाळा सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ग्रामीण भागातील शाळा २७ जानेवारी सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या एक हजार ३४६ शाळा आहेत. या शाळा खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद आदी स्वरूपातील व्यवस्थापनाच्या आहेत. बुधवारी पहिल्याच दिवशी ३४५ प्राथमिक शाळा तर ७७ माध्यमिक शाळा सुरू झाल्या. शाळेत प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी मास्क लावल्याची खात्री करण्यात आली. शाळेत सॅनिटायझरची व्यवस्था केली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर राखून बसविण्यात येत आहे.. शिक्षकांनादेखील खबरदारी म्हणून कोविड चाचणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. सर्व शाळांनी नियमांचे पालन करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिले आहेत.

फुलांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचे स्वागत भातसानगर, मुरबाड : ग्रामीण भागातील शाळांमध्ये बुधवारी पुन्हा घंटा वाजली. पहिल्याच दिवशी शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता. बऱ्याच दिवसांनी मित्रमैत्रिणी भेटल्याने त्यांच्या चहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी शाळांनी फुलांचा वर्षाव करुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.  शाळांमध्ये कोरोनाचे नियम कटाक्षाने पाळले गेले होते. पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेत आले होते. शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरु होते. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी जाणवत होत्या. त्यामुळे शाळा सुरु करावी अशी मागणी केली जात होती. म. ना. बरोरा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची तपासणी व फुलांचा वर्षाव करून वर्गात सोडण्यात येत होते. प्रत्येक वर्गात १५ ते २० विद्यार्थी बसविण्यात आले होते. परिस्थिती पूर्णपणे आवाक्यात आल्यानंतर सर्व शाळा नियमित वेळेनुसार भरवणार असल्याचे शाळा प्रशासनाने म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटपमुरबाड तालुक्यातील २१० शाळा सुरु झाल्या. या शाळांमधील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ग्रामपंचायतीने सर्व शाळांमध्ये निर्जंतुकीकरण केले. शाळांनी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शीला लंबाटे यांनी दिली.

 

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस