विजेच्या धक्क्याने चिमुरडीचा मृत्यू

By Admin | Updated: June 16, 2017 01:53 IST2017-06-16T01:53:09+5:302017-06-16T01:53:09+5:30

बॅडमिंटन खेळताना विजेचा धक्का लागून मुंब्रा येथील दहावर्षीय बालिकेचा बुधवारी मृत्यू झाला. आनंद कोळीवाड्यातील सिल्व्हर आर्च

Chimardi death by electric shock | विजेच्या धक्क्याने चिमुरडीचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने चिमुरडीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बॅडमिंटन खेळताना विजेचा धक्का लागून मुंब्रा येथील दहावर्षीय बालिकेचा बुधवारी मृत्यू झाला.
आनंद कोळीवाड्यातील सिल्व्हर आर्च सोसायटीमध्ये राहणारी मुनिरा मुर्तुजा ठाणावाला ही बुधवारी रात्री मैत्रिणींसोबत जैनी हाउसिंग सोसायटीत बॅडमिंटन खेळत होती. खेळताना कॉक विजेच्या खांबाजवळ पडले. ते ती गेली असता चुकून तिचा स्पर्श विजेच्या खांबाला झाला. या खांबामध्ये वीज प्रवाहित असल्याने मुनिराला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मुनिराचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेला. या खांबामध्ये कमी प्रमाणात वीज प्रवाहित होत होती. मात्र, स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात महावितरणकडे कोणतीही तक्रार नोंदवली नव्हती.

Web Title: Chimardi death by electric shock