शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

मोबाइल गेममुळे मुले हिंसक; डोंबिवलीतील टिळकनगर शाळेचे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 12:36 AM

पबजी, फ्री फायर यासारख्या मोबाइल गेमच्या दुष्टचक्रात अडकून मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढीस लागली असल्याचे टिळकनगर शाळेतील शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : पबजी, फ्री फायर यासारख्या मोबाइल गेमच्या दुष्टचक्रात अडकून मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढीस लागली असल्याचे टिळकनगर शाळेतील शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. ही बाब घातक असल्याने त्याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळेने पालक उद्बोधन सभा घेतली. त्यामध्ये गेममुळे मेंदूच्या पेशींवर होणारा परिणाम आणि त्यातून घडणारे मानसिक आणि वर्तनातील बदलांचे समुपदेशकांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करून पालकांना पुढील धोक्यांची जाणीव करून दिली.मोबाइल गेममुळे अनेक अनुचित घटना रोजच कानांवर पडत असतात. त्यापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करणारी टिळकनगर ही पहिली शाळा ठरली आहे. मुले हिंसक का वागतात? यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केला. त्यामध्ये विभक्त कुटुंबपद्धती, आईवडिलांतील वाद, घटस्फोट, एकल पालकत्व, अतिलाड याव्यतिरिक्त मोबाइल व आॅनलाइन गेममुळे मुलांच्या वर्तनात बदल होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.पाचवी आणि नववीचे विद्यार्थी पबजी, फ्री फायर आणि तत्सम गेम्स किती प्रमाणात खेळतात, हे शिक्षकांनी त्यांच्याकडूनच जाणून घेतले. याबाबत, विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी मन मोकळे केले. या गेमच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहून शिक्षकही आश्चर्यचकित झाले. सद्सद्विवेकबुद्धी नष्ट करणाऱ्या आणि थ्रील अनुभवण्यासाठी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घ्यायला भाग पडणाºया या गेमचा अभ्यास करण्याच्या सूचना शाळेने शिक्षकांना केल्या होत्या. त्यानुसार प्रज्ञा बापट, लीना ठाकूर, मनीषा केंद्रे, लीना दाणी यांनी विविध गेमची माहिती, लेख, विविध माध्यमांतून जमा केली. त्यावरून एक प्रकल्प तयार करून शुक्रवारी पालकांसाठी उद्बोधन सभा घेतली. पाचवी ते आठवी आणि आठवी ते नववी अशा दोन सत्रांत ही सभा झाली. शाळेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. मोबाइलपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी शाळेने सतत असे उपक्रम राबवायला हवेत, असे संस्थेचे कार्यवाहक डॉ. महेश ठाकूर म्हणाले.घातक गेमवर भारतातही बंदी हवी‘एकुलत्या एक मुलांना हवे ते द्या’ या वृत्तीमुळे पालकांचे मुलांच्या वर्तनातील बदलाकडे दुर्लक्ष होत आहे. या फेºयातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी जपान, चीन यासारख्या पूर्वेतील देशांनी घातक मोबाइल गेमवर बंदी घातली आहे.याप्रमाणे भारतातही बंदी आणली पाहिजे. तसेच पालक आणि शिक्षकांनीही जबाबदारी घेऊ न मुलांशी सतत याविषयी बोलायला हवे. चांगले नागरिक घडवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे मत टिळकनगर शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.पालकच आपल्या मुलांना मोबाइल देतात. त्यानंतर, त्यांना गेम खेळण्याची सवय लागते. अनेक विद्यार्थी तर शाळेत जाण्यासाठी रिक्षाला दिलेले पैसे सायबर कॅफेत जाऊ न खर्च करतात आणि दांडी मारतात. त्यांनी यावेळी गेममुळे मेंदूच्या पेशींवर ताण पडून मुले हिंसक बनत आहेत.- श्वेता बंगाली, समुपदेशक, टिळकनगर शाळा

टॅग्स :Mobileमोबाइलthaneठाणे