मुख्यमंत्री कार्यालय विरोधकांच्या रडारवर
By Admin | Updated: July 11, 2015 03:22 IST2015-07-11T03:22:46+5:302015-07-11T03:22:46+5:30
मर्जीतील ठेकेदाराला कंत्राट मिळावे म्हणून महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी ‘वाकड्या’ मार्गाने जाऊन खोट्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री कार्यालयातील

मुख्यमंत्री कार्यालय विरोधकांच्या रडारवर
नारायण जाधव , ठाणे
मर्जीतील ठेकेदाराला कंत्राट मिळावे म्हणून महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी ‘वाकड्या’ मार्गाने जाऊन खोट्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांची ‘मनीषा’ पूर्ण करून १५० ते २०० कोटींचा जलवाहिन्यांचा ‘तो’ प्रस्ताव सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मंजूर करून घेतला असल्याचे खास सूत्रांनी सांगितले.
स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून एमआयडीसी सोबत करारनामा नसतानाही १०० एमएलडी पाणी आणण्याकरिता जलवाहिनीचा प्रस्ताव या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयास सादर केला. असे करताना जलवाहिनी टाकण्यासाठी निधीची अर्थसंकल्पात तरतूद नसताना अन् राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वनविभाग, सीआरझेडच्या आवश्यक परवानग्यांसह जमीन संपादित नसतानाही या सर्व परवानग्या आहेत, असे भासविले. याकरिता नगरविकास विभागातील काही अधिकाऱ्यांच्या ‘मनीषा’ पूर्ण केल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने खातरजमा न करताच त्या प्रस्तावास मंजुरी दिली. नंतर या कंत्राटाचे सहा तुकडे करून निविदा मागविल्या आहेत़