शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मुख्यमंत्री अडीच तास उशिरा आल्याने सभेतून महिलांनी घेतला काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 2:39 AM

बिस्किटे, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप; कडक उन्हामुळे आणलेली गर्दी पांगली

कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचाराकरिता सोमवारी कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात आयोजित केलेल्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल अडीच तास उशिराने दाखल झाले. दुपारी ४ वाजल्यापासून पोरंबाळं घेऊन बसलेल्या बाया फडणवीस येईपर्यंत पार मेटाकुटीला आल्या होत्या. त्यामुळे सभा सुरू होताच मागील बाजूस असलेल्या महिलांनी मुलांना घेऊन सभास्थानातून काढता पाय घेतला. दुपारीच सभास्थानी भेट दिली, तर महिलांचा एक घोळका सभास्थानाच्या प्रवेशद्वारापाशी पैशांची मागणी करत थांबला होता. त्यामुळे ४०० रुपये, बिस्किटांचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्या हे आमिष दाखवून गर्दी गोळा केल्याची चर्चा सभास्थानी कानांवर पडली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र याचा साफ इन्कार केला.सभेच्या ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारले होते. व्यासपीठाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला मोठे कटआउट्स लावले होते. यावर मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची छायाचित्रे होती. सभेला येणारे कार्यकर्ते आणि श्रोत्यांसाठी चार हजार खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे झेंडे सभास्थानी लावण्यात आले होते. एरव्ही, या मैदानात कचऱ्याच्या घंटागाड्या उभ्या केल्या जातात. परंतु, सोमवारी सभा असल्याने त्या तेथून हटवण्यात आल्या होत्या. 

एवढेच नव्हे तर मैदानात धूरफवारणी आणि जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली होती. या सभेसाठी मैदानालगतचे काही रस्ते ‘एकदिशा मार्ग’ करण्यात आले होते. सभेच्या ठिकाणी येणाऱ्या काही हौशी कार्यकर्त्यांनी मोदींचा चेहरा असलेले मास्क लावले होते, तर काहींनी मोदी अगेन अशा अक्षराचे टी-शर्ट परिधान केले होते. उल्हासनगर, भिवंडीसह कल्याण पश्चिम आणि आजूबाजूच्या भागांतून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थिती लावली होती. विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही सभेला हजेरी लावली होती. सभेची वेळ दुपारी ४ ची होती. त्यामुळे साडेतीन वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी मैदानात येण्यास सुरुवात केली.दुपारची वेळ असल्याने उन्हाची काहिली असह्य झाल्याने सभेसाठी आलेल्यांनी खुर्च्या उचलून सावलीचा आडोसा घेतला होता. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे हेलिपॅडची सुविधा करण्यात आली होती. त्याठिकाणी सायंकाळी सव्वापाचला मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लॅण्ड होईल आणि ते पुढील २० मिनिटांत सभास्थळी दाखल होतील, असे नियोजन केले होते. परंतु, पालघरच्या सभेला मुख्यमंत्री उशिराने पोहोचल्याने त्यांच्या सभांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. तब्बल अडीच तास उशिराने म्हणजेच पावणेसातच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे होते. या सभेला भाडोत्री गर्दी जमविल्याचीही जोरदार चर्चा होती. दुपारपासून सभास्थानी फेरफटका मारला असता प्रवेशद्वारापाशी काही महिलांनी उभे राहून पैसे द्या, मगच आता प्रवेश करतो, असा पवित्रा घेतल्याचे पाहावयास मिळाले. पक्षाचे पदाधिकारी त्यांची समजूत काढत होते.
कालांतराने सभास्थानी बसलेल्या महिला व मुलांच्या हातांत बिस्किटांचे पुडे, पाण्याच्या बाटल्या दिसत होत्या. मुख्यमंत्री येण्यास विलंब झाल्याने मुले रडू लागली, त्यामुळे मागे बसलेल्या बाया मुलांना काखोटीला मारून मैदानातून बाहेर पडल्या. त्यामुळे जेवढे कार्यकर्ते होते, तेच सभेला थांबले आणि भाडोत्री कार्यकर्त्यांनी मैदान सोडले, अशी चर्चा सभास्थानी होती. सभेच्या पुढील आणि मागील बाजूस असलेल्या खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. काही पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता प्रत्येक पदाधिकाऱ्यांना १०० हून अधिक माणसे सभेला आणण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती मिळाली. सभेच्या बाहेर उभ्या असलेल्या काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पत्रके वाटून कुणालाही मत द्या, पण मतदान करा, असे आवाहन केले.काय म्हणतात कार्यकर्तेमोदींना पुन्हा एकदा संधी द्यायला काय हरकत आहे? आघाडी सरकारच्या काळात महागाई नव्हती का?- निलेश म्हात्रे, तरुण, डोंबिवलीमोदींशिवाय या देशाला पर्याय नाही. त्यांचा पाच वर्षांचा कारभार हा चांगलाच राहिला आहे. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी मोदींसारखे नेतृत्व देशाला हवे आहे.- दिनेश पाटील, तरुण, कल्याणसभेला आलेली गर्दी ही भाजप कार्यकर्त्यांसह समर्थकांची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकांचे प्रेम असून त्यापोटी लोक सभेला आले होते.- डॉ. राजू राम, भाजपचे ठाणे विभाग सचिव450 पोलिसांचा बंदोबस्तमुख्यमंत्र्यांची सभा असल्याने फडके मैदानाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दोन पोलीस उपायुक्तांसह अन्य अधिकारी आणि कर्मचाºयांसह सुमारे साडेचारशे पोलीस सभास्थानी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. वाहतूक पोलीसही ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत होती. मात्र, सभेच्या ठिकाणचे काही मार्ग बंद करण्यात आले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस