अयोध्येतील सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार; रा. स्व. संघ, विहिंपने दिले निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 13:05 IST2024-01-09T13:05:16+5:302024-01-09T13:05:43+5:30

या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचे ठरवले आहे.

Chief Minister Shinde will go to the ceremony in Ayodhya; Res. self Sangh, VHP invited | अयोध्येतील सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार; रा. स्व. संघ, विहिंपने दिले निमंत्रण

अयोध्येतील सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार; रा. स्व. संघ, विहिंपने दिले निमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्कप्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी सोमवारी सकाळी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन दिले. या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचे ठरवले आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा  लोकार्पण सोहळा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत असताना राज्यातही १८ ते २२ जानेवारी दरम्यान अनेक उपक्रम आयोजित करून हा क्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन शिवसैनिकांना आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जावे असे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. स्व. आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. रामजन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या साऱ्यांचे स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याचि देही याचि डोळे पाहणे ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट असल्याने अयोध्येतील  या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

  • घरावर भगवे ध्वज फडकवणे, मंदिरांना रोषणाई करणे, असे आवाहन यापूर्वीच केले आहे. पक्षाच्या मुख्य नेत्याला या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्याने नेते,पदाधिकाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. 

Web Title: Chief Minister Shinde will go to the ceremony in Ayodhya; Res. self Sangh, VHP invited