मुख्यमंत्री शुक्रवारी मीरा-भाईंदरमध्ये, दोन वास्तूंचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:15 IST2018-03-01T02:15:14+5:302018-03-01T02:15:14+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पूर्वेकडे बांधलेले प्रमोद महाजन सभागृहासह मीरा रोड पूर्वेकडील रामदेव पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे मार्केट या दोन वास्तूंचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सात वाजता होणार आहे.

 Chief Minister inaugurated two buildings in Meera-Bhayander, on Friday | मुख्यमंत्री शुक्रवारी मीरा-भाईंदरमध्ये, दोन वास्तूंचे उदघाटन

मुख्यमंत्री शुक्रवारी मीरा-भाईंदरमध्ये, दोन वास्तूंचे उदघाटन

भाईंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पूर्वेकडे बांधलेले प्रमोद महाजन सभागृहासह मीरा रोड पूर्वेकडील रामदेव पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे मार्केट या दोन वास्तूंचे उद्घाटन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सात वाजता होणार आहे.
भार्इंदर पूर्वेकडील इंद्रलोक परिसरात प्रमोद महाजन सभागृह पालिकेने अत्याधुनिक पद्धतीने विकसित केले असून ते दुमजली इमारतीत साकारले आहे. पहिल्या व दुसºया मजल्यावर एकावेळी ५०० जण समाविष्ट होतील असे वातानुकूलित सभागृह असून तळमजल्यावरही सभागृहासाठी जागा राखीव ठेवली आहे.
मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात मीनाताई ठाकरे मार्केट साकारले असून त्यात परिसरातील फेरीवाल्यांना प्राधान्यक्रमाने सामावून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजाराच्या बाहेरील बाजूस एकूण ९ दुकाने तर तळमजल्यावरील आतील भागात एकूण ६३ गाळे भाजी विक्रेत्यांसाठी बांधले आहेत.
पालिकेकडुन फेरीवाल्यांना कायमस्वरुपी सामावून घेण्यासाठी ठाकरे मार्केट पहिलेच ठरणार असले तरी त्याचे धोरण अद्याप ठरवलेले नाही. परंतु, मीरा रोडमधील नागरिकांना मंगलकार्यासाठी एकूण पाच सभागृह खाजगी सभागृहांच्या तुलनेत माफक दरात उपलब्ध होणार असल्याचे पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले.

Web Title:  Chief Minister inaugurated two buildings in Meera-Bhayander, on Friday