कल्याणमध्ये शिवसैनिकांचा कोंबडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST2021-08-25T04:44:59+5:302021-08-25T04:44:59+5:30

कल्याण : नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ कल्याण शिवसैनिकांनी मंगळवारी कोंबडी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. राणे यांच्या ...

Chicken Morcha of Shiv Sainiks in Kalyan | कल्याणमध्ये शिवसैनिकांचा कोंबडी मोर्चा

कल्याणमध्ये शिवसैनिकांचा कोंबडी मोर्चा

कल्याण : नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ कल्याण शिवसैनिकांनी मंगळवारी कोंबडी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. राणे यांच्या प्रतिमेला चपला मारुन त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. मात्र पोलिसांनी पुतळा जाळण्यापूर्वीच हिसकावून घेतला.

शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसेनेचे अरविंद मोरे, रवींद्र कपोते, महिला आघाडीच्या विजया पोटे यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी अभिषेक मोरे, योगेश निमसे, सुचेत डांबरे, सूरज खानविलकर, भूषण तरडे आदींनी राणे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी राणे यांच्या फलकाला चपला मारण्यात आल्या. त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्नही झाला. मात्र पोलिसांनी शिवसैनिकांच्या हातातील पुतळा हिसकावून त्यांना पुतळा जाळण्यास मज्जाव केला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी हातात कोंबड्या घेऊन तहसील कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना तहसील कार्यालयावर अडविण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी तहसीलदार दीपक आकडे यांच्या दालनात जाऊन राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यासंदर्भात आमदार भोईर यांनी सांगितले की, राणे यांनी यापूर्वीही मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बेताल वक्तव्ये केली आहेत. त्यांनी जीभेला आवर घालावा. शिवसैनिकांचा संयम सुटला तर तो आवरता येणार नाही. राणे यांनी दादागिरीची भाषा करु नये. शिवसेनेतही दादा आहेत, असे आ. भोईर म्हणाले.

............

Web Title: Chicken Morcha of Shiv Sainiks in Kalyan