अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला लागली आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:27 AM2022-05-25T11:27:53+5:302022-05-25T11:28:32+5:30

अंबरनाथमध्ये एका केमिकल कंपनीला आज सकाळी 9.30 वाजताआग लागली आहे. रितीक केम असे या कंपनीचे नाव असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

chemical company catches fire in ambernath midc firefighters continue to put out the blaze | अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला लागली आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला लागली आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

googlenewsNext

अंबरनाथ :अंबरनाथमध्ये एका केमिकल कंपनीला आज सकाळी 9.30 वाजताआग लागली आहे. रितीक केम असे या कंपनीचे नाव असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत रितिक केम नावाची केमिकल कंपनी असून या कंपनीत सॉल्व्हंटवर प्रक्रिया केली जाते. आज सकाळच्या सुमारास या कंपनीत अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून कंपनीतील सॉल्व्हंटने भरलेले अनेक ड्रम बाहेर काढण्यात आले असून त्यामुळे धोका टळला आहे. मात्र आगीच्या कचाट्यात सापडलेले ड्रम विझवण्यात अद्याप अग्निशमन दलाला यश आलेलं नाही. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू असून या आगीत कुणालाही इजा झालेली नाही.
 

Web Title: chemical company catches fire in ambernath midc firefighters continue to put out the blaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.