कल्याण शीळ रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासा; मनसेचे आमदार राजू पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 05:04 PM2020-05-13T17:04:20+5:302020-05-13T17:05:17+5:30

भिवंडी-कल्याण-शील रस्ता हा चौपदरी होती. तो सहा पदरी करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे.

Check the quality of Kalyan Sheel road work; Demand of MNS MLA Raju Patil mac | कल्याण शीळ रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासा; मनसेचे आमदार राजू पाटील यांची मागणी

कल्याण शीळ रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासा; मनसेचे आमदार राजू पाटील यांची मागणी

Next

कल्याण: कल्याण-शीळ रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. हे काम लॉकडाऊनच्या काळात जलदगतीने मार्गी लावले जात असले तरी त्याच्या गुणवत्तेविषयी प्रश्न चिन्ह आहे. काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. कामाची गुणवत्ता तपासली जावी. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणा:या कंत्रटदाराच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी कल्याण ग्राणीमचे आमदार राजू पाटील यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे केली आहे.

भिवंडी-कल्याण-शील रस्ता हा चौपदरी होती. तो सहा पदरी करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर जास्त वाहनांची वर्दळ नाही. याच काळात काम करणो कंत्रटदाराला सोपे जात आहे. महिन्याभरापेक्षा जास्त लॉकडाऊनच्या कालावधीत कंत्रटदाराने गतीने काम सुरु केले आहे. कल्याण -शीळ दरम्यान काम गतीने केले जात आहे. मात्र या कामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह आहे. अनेक नागरीकांकडून या कामाच्या गुणवत्तेविषयी तक्रारी केल्या जात आहे. हे काम सुरु असता राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी त्याठिकाणी देखरेख करीत नाही. हा रस्ता प्रचंड वाहतूकीचा आहे. सहा पदरी रस्त्याने रस्ता प्रशस्त होईल त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. मात्र लॉकडाऊन सुटल्यावर रस्त्यावर वाहतूकाचा ताण असणार आहे.

रस्त्याचे काम निकृष्ट असल्यास लगेच हा रस्ता खराब होऊ शकतो. पुन्हा त्याची दुरुस्ती करणोही वाहतूकीच्या ताणामुळे शक्य होणार नाही. त्यामुळे आत्ता या रस्ते कामाची चौकशी करुन त्याची गुणवत्ता तपासली जावी. कंत्रटदाराने काम निकृष्ट केले असल्यास त्याला कामाचे बिल दिले जाऊ नये. त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

Web Title: Check the quality of Kalyan Sheel road work; Demand of MNS MLA Raju Patil mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.