शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमबदलाने निकालाचा टक्का घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 01:24 IST

शिक्षकांचे मत । संस्कृत, हिंदीमुळे विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

जान्हवी मोर्येे

डोंबिवली : इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळेचा निकाल १० ते १५ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना हिंदी आणि संस्कृत या दोन विषयांमध्ये चांगले गुण मिळाल्याने त्यांची टक्केवारी वाढण्यास मदत झाल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.

निकालाविषयी विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित म्हणाले, निकालाची टक्केवारी घसरणार हे अनपेक्षित होते. यंदाच्या वर्षी अभ्यासक्रम बदलला असल्याने विद्यार्थी आणि पेपर तपासनीस यांच्यासाठी हे सर्व नवीन होते. त्यामुळे आतापर्यंतच्या अनुभवावरून अशावेळी निकाल हा चांगला लागतो. हिंदी आणि संस्कृतमध्ये किंवा केवळ हिंदी, संस्कृत या विषयांत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे या विषयांमुळे टक्केवारी वाढली आहे. शाळेतील संस्कृत विषय घेतलेल्या १४ मुलांना ९९ गुण मिळाले आहेत. गुणांची खैरात यावर्षी बंद झाली आहे. मुलांनी खूप सहजरीत्या ही परीक्षा घेतली असणार. खरंतर, पेपर खूप सोपे होते. त्यामुळे निकाल घसरण्याचे काही एक कारण नव्हते, असे मला वाटते.

टिळकनगर विद्यामंदिरच्या माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका लीना मॅथ्यू म्हणाल्या, यंदाच्या वर्षी पॅटर्न पूर्णत: बदलल्याने हा निकाल घसरला आहे. वर्णनात्मक प्रश्नोत्तरे जास्त होती आणि लघुउत्तरांचे प्रश्न कमी केल्याने निकालावर परिणाम झाला. इंग्रजी विषयात एक उतारा दिला जातो. मात्र, त्यातही बदल केले आहेत. सरकारचे धोरण दरवर्षी बदलते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कठीण जाते. दहावी हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्या टप्प्यावर पॅटर्न न बदलता आठवीपासून बदलण्याची गरज आहे. त्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रूळण्याची संधी मिळेल. आता सरकारने पुन्हा अभ्यासक्रम बदलू नये. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम माहीत झाला आहे. उत्तरे कशी लिहायची ते समजले आहे.सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना यंदा कृतिपत्रकांना सामोरे जावे लागले. अंतर्गत गुणही बंद झाल्याने या निकालामुळे खरी गुणवत्ता समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत करून मिळवलेले हे गुण आहेत. शाळांना निकालाचा टक्का वाढवण्यासाठी आता अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. अभ्यासक्रम बदलल्याचा फटका बसल्याचे एकूणच सर्वांनी मान्य केले.

टॅग्स :thaneठाणेSSC Resultदहावीचा निकाल