पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पालघर दाैऱ्यासाठी ठाण्यातील वाहतुकीमध्ये बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 22:17 IST2024-08-29T22:16:44+5:302024-08-29T22:17:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क ठाणे: पंतप्रधान नरेेंद्र माेदी यांच्या शुक्रवार, ३० ऑगस्ट राेजी आयोजित पालघर जिल्हा दाैऱ्यानिमित्त महत्वाच्या व्यक्ती मुंबई ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पालघर दाैऱ्यासाठी ठाण्यातील वाहतुकीमध्ये बदल
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पंतप्रधान नरेेंद्र माेदी यांच्या शुक्रवार, ३० ऑगस्ट राेजी आयोजित पालघर जिल्हा दाैऱ्यानिमित्त महत्वाच्या व्यक्ती मुंबई अहमदाबाद महामार्गावरून येण्याची शक्यता असल्याने या महामार्गावर वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केल्याची माहिती पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी गुरुवारी दिली.
वाहतूक नियंत्रण शाखेने दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील मुंबई-ठाणे-कळवा मुंब्राकडून नारपोलीतील कशेळीमार्गे गुजरातकडे जाणाऱ्या सर्व माेठ्या वाहनांना कशेळी येथे ‘प्रवेश बंद’ केला आहे. ही वाहने मुंबई नाशिक महामार्गाने माणकोली-भिवंडी-वडपेमार्गे नाशिक दिशेने साेडली जातील. नाशिककडून गुजरातकडे जाणाऱ्या सर्व माेठ्या वाहनांना वडपे नाका येथे ‘प्रवेश बंद’ राहणार आहे. त्याऐवजी ही वाहने वडपे नाका येथून यु-टर्न घेऊन मुंबई नाशिक महामार्गाने साेडण्यात येणार आहेत.
मुंबईकडून घोडबंदरमार्गे तसेच नाशिक-मुंबई महामार्गावरून कॅडबरी ब्रिज खालून यु-टर्न घेऊन अहमदाबादकडे जाणाऱ्या माेठ्या वाहनांना माजिवडा ब्रिज ज्युपीटर वाय जंक्शन येथे प्रवेश बंद केला आहे. या मार्गावरून जाणारी वाहने ही माजिवडा ब्रीजवरून मुंबई-नाशिक महामार्गावरून पुढे सरळ वडपे नाकामार्गे नाशिक दिशेने जातील. मुंबईकडून घोडबंदरमार्गे तसेच कापुरबावडी सर्कल घोडबंदरमार्गे अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांना कापुरबावडी सर्कल येथे प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने कापुरबावडी सर्कल येथून गोल्डन डाईज नाका येथून मुंबई नाशिक महामार्गाने वडपे नाकामार्गे नाशिक दिशेने भिवंडीकडून बाळकुम नाकामार्गे कापुरबावडी सर्कल येथून घोडबंदरमार्गे अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांना कापूरबावडी सर्कल येथे ‘प्रवेश बंद’ केला आहे. ही वाहने ही कापुरबावडी सर्कल येथून गोल्डन डाईज नाका येथून सरळ मुंबई-नाशिक मार्गावरून वडपे नाकामार्गे नाशिक दिशेने
साेडण्यात येणार आहेत.