मालगाडीच्या इंजिनात बिघाड, अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 12:05 IST2021-08-11T12:04:25+5:302021-08-11T12:05:21+5:30

Central Railway News: मालगाडीच्या इंजिनामध्ये झालेल्या बिघाडामुळे अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान, मालगाडी बंद पडली असून, त्यामुळे कर्जतकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Central Railway traffic between Ambernath-Badlapur disrupted due to engine failure | मालगाडीच्या इंजिनात बिघाड, अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मालगाडीच्या इंजिनात बिघाड, अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

अंबरनाथ : मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मालगाडीच्या इंजिनामध्ये झालेल्या बिघाडामुळे अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान, मालगाडी बंद पडली असून, त्यामुळे कर्जतकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या मालगाडीच्या मागे चार लोकल अडकल्या आहेत. आता मालगाडीला मार्गस्त करण्यासाठी वांगणीहून इंजिन मागवण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या तासाभरापासून कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे.  

Web Title: Central Railway traffic between Ambernath-Badlapur disrupted due to engine failure