शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

मध्य रेल्वेची वाहतूक रखडली, कसारा-उंबरमाळीदरम्यान रेल्वे रूळाला तडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 11:06 AM

मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडा गेला आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देरेेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत कसारा ते उंबरमाळीदरम्यान रेल्वे रुळाला तडामुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

कल्याण - मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडा गेला आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी 9.25 वाजण्याच्या सुमारास हा बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.  या खोळंब्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्याही रखडल्या आहेत. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, कसारा व मोखावणे गेटदरम्यान उभी आहे तर 10.10 ची कसारा सीएसएमटी लोकल कसारा स्थानकात रखडली आहे.

(मुलुंड ते माटुंगा आणि सांताक्रुझ ते माहिमदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक)मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर रविवारी (6 जानेवारी) मेगाब्लॉकमुलुंड-माटुंगा रेल्वे स्थानक धीम्या मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वांद्रे अप-डाऊन दरम्यान सकाळी 11.10 वाजल्यापासून  ते दुपारी 4.10 वाजल्यापासून मेगाब्लॉक असणार आहे. 

मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी 10  वाजून 37 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 31 मिनिटांपर्यंत ठाणे स्थानकातूून, सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. सकाळी 11 वाजून 4 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 06 मिनिटांपर्यंत कल्याण स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांवर थांबेल.

सकाळी 10 वाजून 16 मिनिटे ते दुपारी 2 वाजून 54 मिनिटांपर्यंत सीएसएमटी पासून कल्याणच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबविण्यात येतील. त्यामुळे लोकल स्थानकावर पोहोचण्यास 20 मिनिटांचा विलंब लागेल. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सर्व लोकल पोहोचण्यास 10 मिनिटांचा विलंब लागणार आहे.

हार्बर लोकल सकाळी 11 ते 5 राहणार बंद

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांच्या दिशेने जाणाºया लोकल रविवारी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत बंद असतील. चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटीपर्यंत सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 40 मिनिटांपर्यंत लोकल बंद असतील. तर, सकाळी 11 वाजून 34 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 23 मिनिटांपर्यंत सीएसएमटी आणि वडाळा रोडवरून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणारी लोकल बंद असतील.सकाळी 9 वाजून 56 मिनिटे ते सायंकाळी 4 वाजून 16 मिनिटांपर्यंत वांद्रे, अंधेरी, गोरेगाववरून सीएसएमटीकडे जाणा-या लोकल बंद असतील. सकाळी 10 वाजून 45 मिनिटांपासून ते 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत वांद्रे, अंधेरी, गोरेगाववरून सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा बंद असतील.सांताक्रुझ ते माहिम दरम्यान जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते माहिम या स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 10 वाजून 35 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत जम्बो ब्लॉक आहे.

जलद मार्गावरील दोन्ही मार्गांवर जम्बो ब्लॉक आहे. या दरम्यान जलदमार्गावरील लोकल सांताक्रुझ ते माहिम दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत, तर काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे