Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 09:50 IST2025-10-31T09:46:42+5:302025-10-31T09:50:26+5:30
Mumbai Central Line Local Train Update: वांगणी आणि शेलू रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे सीएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे.

Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
Mumbai Local Train Update: वांगणी आणि शेलू रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे सीएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे.
कर्जतहूनमुंबईच्या दिशेला निघालेल्या लोकलची वाहतूक ठप्प झाल्यामुळे चाकरमान्यांना पुन्हा एकदा लेटमार्कचा फटका सहन करावा लागणार आहे. सध्या रेल्वेकडून मालगाडीला नवीन इंजिन लावून ती रवाना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळी चाकरमानी कामावर निघालेले असतानाच हा प्रकार घडल्यामुळे पुन्हा एकदा चाकरमान्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
वांगणी आणि शेलू रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; सीएसएमटी दिशेकडील लोकल वाहतूक ठप्प#CentralRailway#Local
— Lokmat (@lokmat) October 31, 2025