शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

इंधन दरवाढ करून सामान्य जनतेचा गळा घोटला; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 17:20 IST

बेशर्म व नफेखोर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

- नितिन पंडीत

भिवंडी- केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल , डिझेलव घरगुती वापराच्या गॅस व इतर वस्तूंची दरवाढ करून भाजप सरकारने देशातील सामान्य जनतेचा गळा घोटण्याचे काम केले असून या बेशर्म व नफेखोर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम असून मुजोर भाजप सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत उलथून टाकल्याशिवाय काँग्रेसपक्ष सुस्त बसणार नाही अशी प्रतिक्रिया काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भिवंडीत शनिवारी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी सोनाळे येथे आयोजित केलेल्या जाहीर कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष माजी खासदार सुरेश टावरे , तालुकाध्यक्ष राकेश पाटील , शहापूर तालुकाध्यक्ष महेश धानके, कल्याण ग्रामीण अध्यक्ष परशुराम पितांबरे, अंबरनाथ ग्रामीणचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील , मुरबाड ग्रामीणचे तालुकाध्यक्ष चेतनसिंग पवार यांच्यासह , भिवंडी शहराध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांच्यासह भिवंडी शहर व ग्रामीण भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या इंधन दर वाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून मोदी सरकारच्या दर वाढी विरोधात राज्यभर काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सुमारे २० हजारहुन अधिक स्वाक्षरी पत्रक यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे माजी जिल्ह्याध्यक्ष दयानंद चोरघे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केले. 

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षाच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले असून दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सामान्य नागरीकांच्या आवाक्याबाहेर गेला असून मोदी सरकारने जनतेला कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही, उलट कररूपाने करोडो रुपयांची लूट चालवली आहे. पेट्रोलने शंभरी पार केली असून डिझेल दर शंभरी जवळ पोहचले आहे. केंद्र सरकार रस्ते विकासाच्या नावाने १८ रुपये तर कृषी विकासाच्या नावाने ४ रुपये असे २२ रुपये विकासाच्या नावाने लुटत असल्याचा खुलासा देखील यावेळी नाना पटोले यांनी केला . 

यावेळी अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असतानाही मोदी सरकार तेल दरांमध्ये भरमसाठ कर लावून जनतेची लूट करत असून मोदी सरकारने पेट्रोल डिझेलवरील करामधून मागील ७ वर्षात तब्बल २२ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्या आला. गॅस दर वाढीमुळे उज्ज्वला योजनेतील लोकांनाही आता गॅस सिलेंडर घेणे परवडत नसून डिझेल महाग झाल्याने सार्वजनिक तसेच मालवाहतुकही महाग झाली. खाद्यतेलही २०० रुपये लिटर झाले असल्याने या दरवाढीत सर्वसामान्यांबरोबरच मध्यमवर्गही भरडला जात असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसPetrolपेट्रोलDieselडिझेलCentral Governmentकेंद्र सरकार