शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघ केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षकांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 18:53 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतलेल्या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने विधानसभांच्या निवडणुकी करीता जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देविना परवानगी कुठलीही सभा, बैठका होणार नाहीप्रचाराच्या वाहनांवर विशेष लक्षमद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाने पायबंद घालावा

ठाणे : विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात शनिवारी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक हजर झाले आहेत. त्यांच्या नियंत्रणातील मतदारसंघाच्या उमेदवारांच्या खर्चावर ते बारीक लक्ष ठेवणार आहेत. यास अनुसरून केंद्रीय निवडणूक निरिक्षकांनी दिलेल्या सुचनांचे यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिले.       जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतलेल्या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने विधानसभांच्या निवडणुकी करीता जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये भिवंडी, ग्रा.साठी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून विवेकानंद यांची नियुक्त केली आहे. याप्रमाणच ते भिवंडी पश्चिम , भिवंडी पूर्व या मतदारसंघांचेही काम पाहणार आहेत. तर आशिष चंद्र मोहंती हे शहापूर , कल्याण पश्चिम, मुरबाड मतदारसंघाचे काम पाहणार आहेत. तसेच एस आर कौशिक यांच्यावर अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण(पूर्व.) मतदारसंघाची जबाबदारी आहे. शिव स्वरूप सिंग यांच्यावर डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ठाणे, या मतदार संघाची जबाबदारी आहे. तर उमेश पाठक हे मीरा-भार्इंदर, ओवळा-माजीवाडा, कोपरी- पाचपाखाडी, क्षेत्रात काम पाहणार आहेत आणि के रमेश हे मुंब्रा-कळवा, ऐरोली आणि बेलापूर या मतदार संघांमध्ये कार्यरत राहणार आहेत.          जिल्ह्यातील १८ मतदारसंघांचा ताबा या केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेऊन काही महत्वपूर्ण सुचना या निवडणूक निरीक्षकांनी दिल्या. या सर्व पथकांनी उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची बाब खर्च अहवालात समाविष्ठ होईल याची दक्षता घेण्याच्या सुचना केल्या आहे. पोलीस, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच जिल्ह्यात नेमण्यात आलेले फ्लाईग स्कॉड, व्हीडीओ सर्व्हिलन्स टीम, स्थिर निगराणी पथके यांनी वाहनांची तपासणी करावी. निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सभा, बैठकांची माहिती घेऊन त्यानुसार पथकांची नेमणूक करण्याच्या विषयावर यावेळी चर्चाही करण्यात आली.        विना परवानगी कुठलीही सभा, बैठका होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रचाराच्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सुचनांही त्यांनी यावेळी केल्यात. राजकीय पक्षाच्या व उमेदवाराच्या सभा आणि कॉर्नर सभाचे चित्रीकरण करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. व्हडओ पथक व भरारी पथकांना सक्र ीय ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आयकर विभाग आणि लेखा विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन काम करावे. विविध मार्गाने येणाऱ्या मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाने पायबंद घालावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले. विविध समिती प्रमुखांनी यावेळी समित्यांच्या कामाची माहिती दिली. या बैठकीला उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी तसेच समित्यांचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारी